शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीच्या वादातून मृत्यूची नोंद करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: April 6, 2017 00:31 IST

पोलिसांची दिरंगाई : महावितरणच्या मृत कर्मचाºयाच्या नातेवाईकांची फिरवाफिरव

जळगाव : महावितरण कंपनीत कार्यरत असलेल्या जितेंद्र लक्ष्मण पाटील (४५)रा़ शंकरअप्पानगर, पिंप्राळा यांचा बुधवारी कामावर दुपारी  १२ वाजेच्या सुमारास हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला़ मृत्यूनंतर नोंदीसाठी नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी रामानंदनगर, जिल्हापेठ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वारी करण्याची वेळ आली़ पोलिसांनी हद्दीचा वाद निर्माण केल्याने तब्बल दोन तासानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली़जितेंद्र पाटील हे सकाळी ९ वाजेच्या नेहमीप्रमाणे एमआयडीसीतील महावितरण कंपनीच्या कार्यालयात गेले़ साफसफाईचे काम केले यानंतर त्यांना दुपारी ११़३० वाजता मळमळ होवून उलटी झाली़ अचानक प्रकृती बिघडल्याने भास्कर मार्केट परिसरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ जितेंद्र यांचे वडील लक्ष्मण  पाटील यांचा दहा ते बारा वर्षांपूर्वी कामावर असताना अपघाती मृत्यू झाला होता़ त्यांच्या जागी २०१२ मध्ये जितेंद्र पाटील नोकरीवर लागले होते़ त्यांच्या पश्चात याचा आई मिराबाई, दोन भाऊ मनोज व विनायक, पत्नी, मुलगा पियुश व मुलगी पूजा असा परिवार आहे़ पियुष १ लीत व पूजा ही ९ वीत आहे़ जितेंद्र  यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले़ हद्दीच्या वादामुळे नातेवाईकांची फिराफिरजितेंद्र पाटील यांचा दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ त्यांच्या मृत्यूच्या नोंदीसाठी नातेवाईकांसह त्यांच्या परिसरातील नागरिकांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले़ याठिकाणी त्यांना एमआयडीसी परिसरात ड्युटीवर असताना घटना घडल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले़ एमआयडीसी ठाण्यात पोहचल्यावर ते पिंप्राळा येथील रहिवासी असल्याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी दिला़ रामानंदनगर येथे पोहचल्यावर कर्मचाºयांनी जिल्हापेठ हद्दीतील खाजगी रूग्णालयात मृत्यू झाल्याने त्या ठिकाणी जाण्यास सांगितले़ अशा प्रकारे दोन तास फिराफिर झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय गाठले़ याठिकाणी पोलीस कर्मचाºयांसोबत शाब्दीक चकमक उडाली़ यानंतर दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.