शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षाचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:17 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर वाटिकाश्रमजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भरत रामचंद्र सोनवणे (वय ५०, रा. ...

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर वाटिकाश्रमजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भरत रामचंद्र सोनवणे (वय ५०, रा. कांचन नगर) हे रिक्षाचालक ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत रामचंद्र सोनवणे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचे. राष्ट्रीय महामार्गावरील वाटिकाश्रम येथे राहणारे मित्र मगन काळे यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ठेवण्यात आला होता. यावेळी गोंधळाचा कार्यक्रम आटोपून ते कांचन नगरात जाण्यासाठी रात्री ११ वाजता पायी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर जात असतांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी कल्पना, ललित व घनश्याम हे दोन मुले आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास हवालदार गुलाब पाटील करीत आहे.