शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

शस्त्रनिर्मितीचे साहित्य चोरण्याचा प्रय} फसला

By admin | Updated: January 20, 2017 00:49 IST

वरणगाव : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत शस्त्रास्त्र निर्मितीसाठी आलेले साहित्य (कच्चा माल) लांबविण्याचा प्रय} फसल्यामुळे चोरटय़ांनी ट्रकचालकास बेदम मारहाण केली.

वरणगाव :  वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत शस्त्रास्त्र निर्मितीसाठी आलेले साहित्य (कच्चा माल) लांबविण्याचा प्रय} फसल्यामुळे चोरटय़ांनी ट्रकचालकास बेदम मारहाण केली. आशिया महामार्गावर  गुरुवारी पहाटे 3.30 ते चार वाजेच्या सुमारास हे थरार नाटय़ घडले. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली  आहे.  वाहनाचा चालक व मालक  राजेश लक्ष्मण सुरवाडकर (रा.गणपतीनगर, वरणगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी येथून ट्रक क्र.(एमएच 19-ङोड 1362) मध्ये शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे नऊ टन एवढे ब्रास कंप घेऊन सुरवाडकर हे 18 रोजी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी  येथे पोहोचले. त्यांना तासभर विलंब झाल्यामुळे ट्रकमधील साहित्य खाली करून घेण्यास  प्रशासनाने नकार दिला आणि  उद्या सकाळी ट्रकमधील साहित्य खाली केले जाणार असल्याचे चालकास सांगितले. ट्रकचालकाने ऑर्डनन्स फॅक्टरीतून ट्रक  ओळखीच्या गॅरेजवर लावला आणि ते  ट्रकच्या कॅबिनमध्येच झोपले होते. मध्यरात्री  चोरटय़ांनी  ट्रकवरील ताडपत्री काढून  ब्रॉस कंपच्या गोण्या त्यांच्या जवळील ट्रक क्र.(एम.एच.38 सी.8987) मध्ये भरण्यास सुरूवात केली. ट्रकमध्ये कुणी तरी चढल्याची चाहुल सुरवाडकर यांना लागली. तो र्पयत चोरटय़ांनी 238 पैकी 29 गोण्या या ट्रकमध्ये भरल्या.  सुरवाडकर यांनी विरोध करताना चारही चोरटय़ांनी त्यांना  मारहाण करीत ट्रक पळविला परंतु सुरवाडकर यांनी प्रसंगावधान राखत  चोरटे पळवित असलेल्या ट्रकच्या स्टेअरिंगलाच ते लटकले यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला लिंबाच्या झाडावर आदळला. याचा फायदा घेऊन ट्रकमधील चोरटे पसार झाले. रात्रीच्यावेळी काही लोकांना   जखमी अवस्थेत एक अनोळखी रस्त्यावर आढळून आला. त्यांनी त्यास पोलिसांकडे आणले असता   चौकशीत तो  चार चोरटय़ापैकी एक असल्याचे निष्पन्न झाले. राजेश सुरवाडकर यांच्या फिर्यादीवरून प्रभातसिंग रुपसिंग पटेलिया (रा.नाडा,ता.सहेरा, जि.पंचमहल (गुजरात) व अन्य तीन विरोधात नऊ लाख रुपये किमतीचे ब्रॉस कंप लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटय़ांनी वापरलेला ट्रकचा  नंबर प्लेट बदलविण्याचे निष्पन्न झाले असून ट्रक चोरीचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  तपास उपनिरीक्षक नीलेश वाघ, हवालदार सुनील वाणी, मझहर पठाण करीत आहे. आरोपीस अटक करण्यात आली.