जामनेर : शहरातील शिव कॉलनीत 6 रोजी मध्यरात्री घरासमोर उभ्या असलेल्या कारच्या चोरीचा प्रय} फसला.शिव कॉलनी भागातील रहिवासी व सध्या औरंगाबाद येथे नोकरी करत असलेले संतोष मुरलीधर जैन हे सुटी असल्याने जामनेर येथे आले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी जैन यांची मालकीच्या कार (एमएच 20-डीबी 0996)चे काच फोडून दरवाजा उघडला व कार चोरण्याचा प्रय} करीत असताना कारमधील इलेक्ट्रॉनिक सिस्टिम वाजल्याने आजूबाजूचे नागरिक व गाडीमालक झोपेतून जागे झाले. त्या वेळी लागलीच अज्ञात चोरटे पसार झाले. त्यामुळे चोरटय़ांचा कारचोरीचा प्रय} फसला. याबाबत गाडीमालक संतोष जैन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
जामनेरात कार चोरीचा प्रय} फसला
By admin | Updated: May 8, 2017 00:57 IST