शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआरच्या नावाखाली राजकीय सुपारी घेऊन बहुजन लोकप्रतिनिधींना संपविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी जळगावात केला. बीएचआर या गोंडस नावाखाली राजकीय सुपारी घेऊन तसेच सरकारी यंत्रणेला हाताशी धरत बहुजन लोकप्रतिनिधींना संपविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी शनिवारी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाच्या सुनावणीवेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा उल्लेख आल्याचे समोर आले आहे. आपण अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणतीही ‘सेटलमेंट’ न करता पूर्ण कर्ज भरले

जिल्ह्यातील विजेचा प्रश्न असो की, अवैध धंदे असो. यांच्याविषयी आवाज उठविल्याने आक्रमकता वाढत असल्याचे पाहून मला संपविण्याचा डाव सुरू असल्याचा दावा यावेळी आमदार चव्हाण यांनी केला. ११ ऑगस्ट रोजी बीएचआर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान माझ्या नावाचा उल्लेख आलेला नसताना तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. प्रत्यक्षात बीएचआर, सुनील झवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नसताना विनाकारण नाव गोवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. २०१२ मध्ये मी बीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेतले व ते २०१४ मध्येच कोणतीही तडजोड न करता पूर्ण कर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले.

चौकशीला घाबरून पळणारा आमदार नाही

तपास यंत्रणेने माझ्याशी संबंधित काही गैरव्यवहार झाले असल्यास तशी चौकशी करावी व काही आढळल्यास कारवाई करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. चौकशी होणार म्हणून घाबरून पळून जाणारा व लांब राहणारा आमदार मी नाही, असाही टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. या प्रकरणाची माहिती मी मागविली असून, ती पूर्ण मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर विधिमंडळात सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगावातच कारवाई का?

बीएचआर पतसंस्था ही मल्टीस्टेट संस्था असल्याने तिचे कार्यक्षेत्र देशभर आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यातीलच मंडळींवर कारवाई का? इतर ठिकाणी का कारवाई होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.