शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जळगाव जिल्ह्यात १३ बसेसवर दगडफेक व चालकाला जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:45 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्'ात तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यात एकूण १३ बसेसवर दगडफेक झाली.जळगाव शहरात एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. जैनाबादमध्येही बसवर दगडफेक झाली. अमळनेर येथे सात एस.टी.बसेस व दोन ट्रक तर चाळीसगाव येथे चार बसेसवर दगडफेक झाली. अमळनेरच्या घटनेत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देभीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद  पोलिसांच्या सुट्टया रद्दजामनेर, भसावळ व पारोळा येथे रास्ता रोको 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि २ : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्'ात तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यात एकूण १३ बसेसवर दगडफेक झाली.जळगाव शहरात एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. जैनाबादमध्येही बसवर दगडफेक झाली. अमळनेर येथे सात एस.टी.बसेस व दोन ट्रक तर चाळीसगाव येथे चार बसेसवर दगडफेक झाली. अमळनेरच्या घटनेत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.चोपडा आगाराच्या चोपडा-जळगाव या एस.टी.बसवर शिव कॉलनीनजीक रेल्वे उड्डाणपुलाजवळ दहा ते पंधरा जणांचा जमावाने दगडफेक केली. बस थांबताच चालक जगतराव लोटन पाटील (वय ५५ रा.चोपडा) यांच्या अंगावर व सीटवर पेट्रोल टाकले. त्यानंतर लागलीच पेटती काडी फेकली. सीटने पेट घेताच चालक जागेवरुन उठले. तर दुसरीकडे अन्य जणांकडून बसवर दगडफेक झाली. यात सखुबाई नाना भील (वय ६८,रा.किनगाव, ता.यावल) व डिंगबर महाजन (वय १७ रा.जळगाव) हा आयटीआयचा विद्यार्थी जखमी झाला. शहरातील जैनाबाद परिसरातही एस.टी.बसवर दगडफेक करण्यात आली.जामनेर, भसावळ व पारोळा येथे रास्ता रोको जामनेर, भुसावळ व पारोळा येथे एस.टी.बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन केले. या तिन्ही ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जळगाव शहरातून बसेसच्या फेºया थांबविण्यात आल्या होत्या. चाळीसगाव येथे दगडफेक करणारे तरुण पसार झाले आहेत तर जळगाव शहरातील तरुणांच्या शोधासाठी पथक रवाना झाली आहेत. या हल्लेखोरांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी मालमत्तेचे नुकसान तसेच कामात अडथळा आणल्याचा १०ते१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरहून पोलीस,अधिकारी माघारी बोलविलेदरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाची स्थिती असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. अहमदनगर येथे पाठविण्यात आलेले १६९ कर्मचारी, १४ उपनिरीक्षक,दोन निरीक्षक यांना माघारी बोलावण्यात आले आहे तर अमरावती येथून राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय नियंत्रण कक्ष व गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाºयांनाही राखीव ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अफवा तसेच सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेऊ नये. कोणीतीही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क साधावा. अफवा पसरविणाºयांविरुध्द गुन्हे दाखल केले जातील.-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक