शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 18:06 IST

पहूर परिसरात चिंता : मका उत्पन्नात येणार कमालीची घट

पहूर, ता. जामनेर : सुलतानी व अस्मानी संकटाच्या चक्रात दरवर्षी शेतकरी सापडत आला असून यंदा मका पिकावर पहूर सह परीसरात लष्करी अळीचे आक्रमण झाल्याने मका उत्पादक शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मका उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.पहूर सह परीसरात तीन हजार ६०० हेक्टर जमिनीवर खरीपात मका पिकाची लागवड यंदा झाली आहे. मात्र यंदा या पिकावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने मका पिकाला अळीपासून वाचविण्यासाठी बळीराजा महागडी किटकनाशके फवारणी करताना दिसत आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर मका पिकाला ही अळी चाळणी करून ठेवते त्यामुळे मका पिकांचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना जिकरीचे होणार आहे. या लष्करी अळीने नाशिक जिल्ह्यात थैमान घातल्याने शेतकऱ्यांना मका पिकावर नांगर चालविण्याचे संकट ओढवले आहे. मका पीक नगदी असून चांगला भाव गेल्यावर्षी पासून मक्याला मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांची मका पिकाकडे ओढ दिसून येत आहे.कृषी विभाकडून उपाययोजनामका पिकाला लष्करी अळी पासून वाचवण्यासाठी कृषी विभाग परीसरात शेतकºयांना मार्गदर्शन करून ग्रामपंचायत मध्ये लष्करी अळीचे भित्ती पत्रके लावली जात आहे.अर्ध्या किमंतीत किटकनाशके दिली जात असून कृषी सहायकांडून याचे सर्वेक्षण करून आठवड्यातून दोन वेळा कृषी आयुक्त कार्यालयाला अहवाल आॅनलाईन पाठविला जात आहे. काही शेतांमध्ये अळी खाण्यासाठी पक्षांना बसण्याकरीता बांबू लावण्यात येत आहे. शेती शाळा दहा ते पंधरा शेतकºयांची घेण्यात येऊन प्रत्यक्ष शेतांवर अधिकारीजात आहेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी एम. जी.जंगम यांनी केले आहे.मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. यामुळे खर्चात वाढ झाली असून उत्पन्नात घट येणार आहे. शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.-शैलैश कृष्णा पाटील, शेतकरी पहूर पेठमका पिकाच्या पोंग्यात राख मिश्रित घेसु वाळू किंवा कार्बोफिराँनचा वापर करावा. अमावास्याला अळी अंडी घालते त्यामुळे अमावस्या झाल्यावर दोन तीन दिवसांत पंधराशे पी.पी. एम. निंबोळी अर्क फवारणी करावी व तेथून पाच ते सहा दिवसांनी किटकनाशकाची फवारणी करावी. यामुळे किड नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल. पोंग्यात किंवा मक्याच्या पानांवर विष्टा आढळून आल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षणे समजावे. निश्चित या किडीमुळे मक्याच्या उत्पन्नात घट येणार आहे.-बी.एम.शिंपी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

टॅग्स :agricultureशेती