शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देवझीरी वनक्षेत्रात वनविभागाच्या पथकावर हल्ला, सागवान तस्करांनी केली तुफान दगडफेक; हवेत गोळीबार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:41 IST

सातपुड्यातील देवझीरी वनक्षेत्रात उभ्या झाडांची कत्तल करीत असताना मज्जाव केल्याने वनकर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली.

चोपडा :  सातपुड्यातील देवझीरी वनक्षेत्रात उभ्या झाडांची कत्तल करीत असताना मज्जाव केल्याने वनकर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत आठ कर्मचारी जखमी झाले. यावेळी जमाव पांगविण्यासाठी हवेत गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या. याबाबत ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत  वनसुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता रविंद्र रेवसिंग बारेला यास भागडया भिलाला रा, मोहनपुरा ता.वरला जि. बडवाणी याने वनकर्मचाऱ्यांना लाकडे तोडू दिले नाही  म्हणून " बघा आम्ही काय करतो?" असा दम दिला. यानंतर २२ रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान  देवझिरी वन विभागाच्या  परिसरातवासुपॉइट ते पाटी कॅम्पचे मध्यभागी  जंगलात ३० ते ३५ अनोळखी इसम २५ ते ३० झाडे तोडत असतांना दिसले. त्यांना  प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी  गोफणीने दगडं मारुन  एसआरपीएफचे जवान व वन विभागाचे कर्मचारी व रोजंदारीचे कर्मचारी यांना दुखापत  केली.  आरोपींनी कुऱ्हाडही फेकली असता एसआरपीचे शे.आसीफ शे.अकबर यांनी दोन प्लॅस्टिक गोळयांचे फायर केल्यानंतर एक रिकामी केस घटनास्थळी मिळून आली असून एक रिकामे केस हे गहाळ झालेले आहे. याबाबत  आडवद पोलीस ठाण्यात वनक्षेत्रपाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात  ३० ते ३५ इसमांविरुध्द भादवि लम ३५३, ३३२,१४३,१४७,१४८,१४९,४२७ ५०६, मुपो एक्ट १३५ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान,  दगडफेकीत  वनपाल प्रकाश बळीराम महाजन ,  वनरक्षक नरेंद्र सुभाष चित्ते, वनरक्षक रोहित सिताराम पावरा, वनसेवक साई फकीरा बारेला, भाऊसिंग गाठया बारेला, हवालदार  के. आर. शिंदे, डि. बी. सपकाळे, एस. एन. पाटील हे जखमी झाले.  जखमींवर   वैजापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यावर त्यांना  अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल  केले आहे. तर अनोळखी इसमांनी तोडलेल्या सागवानी  लाकडांचा पंचनामा  करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोकुळ बयास हे करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगावforest departmentवनविभाग