रावेर : नवविवाहितेला शेतमजुरीसाठी कामाला नेवून शेतमालकाने अत्याचार केल्याची घटना आभोडा रस्त्यावर ३० मे ते २ जून दरम्यान घडली. दरम्यान, अत्याचाराची व्यथा पीडितेने सांगितल्याने पतीसह आप्तेष्टांनी आरोपीला मारहाण केली. त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपीने साथीदारांसह पीडितेच्या काकावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी रावेर पोलिसात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही गुन्ह्यातील १० आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, रमजीपूर येथील शेतकरी भास्कर नामदेव कावडकर याने चार पाच दिवसांपूर्वी त्याच्या आभोडा रस्त्यावरील शेताच्या मार्गातच माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील यांच्या शेतात रखवालदार म्हणून वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका १९ वर्षीय नवविवाहितेला निंदणासाठी एकाच महिलेची आवश्यकता असल्याचे सांगून मोटारसायकलवर बसवून थेट शेतात नेले. शेतातील केळी बागेत त्याने तत्पूर्वीच अंथरून ठेवलेल्या गोधडीवर अत्याचार केला. आरोपीचे साथीदार त्याचे रमजीपूर येथील साथीदार अमोल अरूण धनगर, महेश रमेश महाजन, आनंदा अशोक कावडकर, ललित कांतीलाल महाजन, नितीन पाटील व इतर दोन तीन लोक यांनी पीडितेच्या माहेरात जावून तिचे वडील, भाऊ व चुलतभाऊ यांना मारहाण करून तिच्या काकावर जीवघेणा हल्ला केला.
याप्रकरणी रावेर पोलिसात सदर पीडितेच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात बलात्काराचा, शिवीगाळ व मारहाण करून धमकी देणे, दंगलीचा व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर पीडितेच्या पोटात वेदना होऊन तिला अस्वस्थ होऊ लागल्याने तिने आपल्या पतीजवळ घडल्या अत्याचाराची व्यथा सांगितल्याने तिचा पती, भाऊ, काका अशा तीन चार जणांनी आरोपी भास्कर नामदेव कावडकर याला २ मे रोजी रस्त्यावर गाठून मारहाण केल्याने सदर आरोपी जखमी झाला. त्याचे वाईट वाटून आरोपी भास्कर नामदेव कावडकर याने आरोपी नकाराम या आदिवासी रखवालदाराने व त्याच्या शिंदखेडा येथील सासरवाडीतील शांताराम, दावसिंग व परमसिंग अशा सासरा, चुलत सासरा व शालकांनी उसणे पैसे दिले नाही तर त्याच्याविरुद्ध पत्नीचे नाव घेतले म्हणून खोटे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याला मारहाण केल्याची घटना शिंदखेडा येथील पीडितेच्या माहेरात रस्त्यावर २ जून रोजी घडली, अशा आशयाची फिर्याद बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी भास्कर नामदेव कावडकर याच्या फिर्यादीवरून जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा पीडितेचा पती, काका व शालकांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
सपोनि शीतलकुमार नाईक यांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपी भास्कर नामदेव कावडकर व त्यांच्या पाचही साथीदारांना अटक केली आहे. आरोपीवर जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश सानप पुढील तपास करीत आहेत.