शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

टपरीसह एटीएम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 21:59 IST

जामठी येथील घटना : श्वान पथकाला केले पाचारण

बोदवड : तालुक्यातील जामठी येथे १४ मध्यरात्रीच्या दरम्यान खासगी कंपनीचे एटीएम मशीन व बाजूलाच असलेली पानटपरी चोरट्यांनी फोडली. यात एटीएमची रक्कम सुरक्षित आहे तर टपरीतून रोख रक्कम, सिगरेटीे पाकिटे व शितपेयाच्या बाटल्या असा सात हजाराचा माल लंपास केला.सकाळी सात वाजेच्या दरम्यान ैैहा प्रकार लक्षात आला. सदर एटीएमचे शटर वाकवून एटीएम मशीन कुदळ व टॉमीच्या सहय्याने चोरट्यांनी फोडले परंतु सदर एटीएमच्या आतील लॉक व रोख रक्कमेचा ट्रे फोडण्यात अपयश आल्याने त्यांनी मशीनचे व तेथील सीसीटीव्हीचे नुकसान केले. त्यानंतर बाजूलाच संदीप बी माळकर यांची असलेली पानटपरी त्यांनी फोटली. तर बाजूलाच बसून दारू रिचवल्याचेही तेथे पडलेल्या बाटल्यांवरुन दिसून येते.एटीएम मध्ये होतेसाडेतीन हजार रुपयेजे एटीएम फोडण्यासाठी चोरटे आले होते, त्यामध्ये बारा रोजी एक लाख रुपये लोड करण्यात आले होते त्यातून ग्राहकांनी पैसे काढल्यामुळे फक्त साडेतीन हजाराची रोकड त्यात शिल्लक होती. ती रक्कमही सुरक्षित राहिली मात्र तेथील तेथील साहित्याचे नुकसान झाले आहे.सदर घटनेची माहिती कळताच बोदवड पोलीस पथक तसेच मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, जिल्हा पोलिसांचे श्वान पथकातील श्वान जंजीर यांचे सोबत संदीप परदेशी निलेश झोपे, तसेच ठसे तज्ञ दाखल झाले होते.याबाबत बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान या घटनेने गावात व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जंजीर श्वानाने दाखवला रस्त्यापर्यंत मार्गपोलीस पथकातील श्वान जंजीरला आरोपींनी चोरीत वापरलेल्या सळईचा वास दिला असता त्याने थेट पळत राजणी गावाकडे जाणाºया रस्त्याचा मार्ग दाखवला असून सदर रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही चे चित्रण पोलीस पथक तपासत आहे.