शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

विद्याथ्र्याला बेदम मारहाण

By admin | Updated: February 15, 2017 01:02 IST

गणेश कॉलनी परिसरातील घटना : मारहाणकर्तेही विद्यार्थीच

जळगाव : शाळकरी विद्याथ्र्यामध्येच गुन्हेगारी करणारी टोळी सक्रीय झाली असून गणेश कॉलनी परिसरात दहावीच्या वर्गात शिकणा:या उज्‍जवल संजय पाटील (वय 14 रा.पिंप्राळा, जळगाव) या विद्याथ्र्याला दहा ते बारा विद्याथ्र्यानी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली व त्याच्या खिशातील 2 हजार 200 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.मारहाण करणारे विद्यार्थी हे महामार्गावरील अग्रवाल चौक परिसरातील नामांकित शाळेतील आहेत. उज्‍जवल हा 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता गणेश कॉलनीत शिकवणीसाठी जात असताना तेथे त्याच्या वर्गातील एक मित्र त्याला भेटला. यावेळी समोर थांबलेले काही विद्यार्थी त्याच्याकडे पाहून हसू लागले. त्याचा जाब विचारला असता जास्तच चिडवायला लागले. शिवीगाळ करु नका असे सांगितले असता त्यांनी तु आमचे काय करशील, असे सांगून एकाने माङो वडील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यानंतर 10 ते 12 जणांनी बेदम मारहाण केली व तेथून दादावाडी परिसरात घेवून गेले. तेथेही मारहाण करुन प्रोजेक्टरचे 200 व शिकवणीचे 2 हजार रुपये हिसकावले. यावेळी अंगावरील कपडेही त्यांनी फाडले. हा प्रकार घरी सांगितला तर तुला मारुन टाकू अशीही धमकी या मुलांनी दिली. या मारहाणीत उज्‍जवलचा पाय फ्रॅर झाला आहे. यापूर्वीही यातील काही मुलांनी 12 जानेवारी रोजी आयएमआर मैदानावर नेऊन मारहाण केली होती. या घटनेबाबत उज्‍जवल याचे वडील संजय पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे जिल्हापेठ पोलिसांनी सांगितले.