शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे अटलजींनी सर्वपक्षीय श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:06 IST

नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी केला अटलजींच्या कार्याचा गौरव

पारोळा, जि.जळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना बुधवारी सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.बोहरा सेंट्रल स्कूलच्या प्रांगणात ही शोकसभा घेण्यात आली.या वेळी खासदार ए.टी. पाटील यांनी, राजकीय लोकांच्या हृदयात आपुलकीचे स्थान मिळविणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व अटलबिहारी यांचे होते, संसदेची गणिमा टिकून ठेवणारे हजरजबाबी नेते होते, असे सांगितले.आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले, अटलजी हे राजधर्म पाळणारे, देशाला विकासाची दिशा देणारे सर्वमान्य नेते होते. त्यांच्या अंगी मोठेपणा होता. त्यांच्यासारखा नेते होणे आता शक्य नाही.माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे म्हणाले, लोकशाहीवर निष्ठा ठेवणारे सामान्य जनतेला न्याय देणारे सर्वांना हवेहवेसे वाटणार असे सर्वमान्य नेतृत्व अटलजी यांचे होते. अटलजी दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते, असे माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. अजात शत्रू असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलजी होते, असे नगराध्यक्ष करण पवार म्हणाले.माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष पिरन अनुष्ठान, दत्तात्रय महाजन, डॉ.शांताराम पाटील, बापू नावरकर, डॉ.जे.के.पाटील, मिलिंंद मिसर, व्ही.एन.कोळी, अनिल पाठक, वामन चौधरी आदींनी भावना व्यक्त केल्या.जि.प.चे माजी सदस्य बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण दाणेज, नगरसेवक रोहन मोरे, नगरसेविका रेखा चौधरी, सुनंदा वाणी, वर्षा पाटील, सुरेखा बडगुजर, मुकुंदा चौधरी, प्रकाश महाजन, पी.जी.पाटील, बाळासाहेब पाटील, केशव क्षत्रिय, श्रीकांत शिंपी, अतुल मोरे, मधुकर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.शैलेश पाटील यांनी केले.