शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्याच्या अश्विनी गुजराथी इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या चेअरमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चोपडा : महाराष्ट्रातील चंद्रपूरपासून ते इगतपुरीपर्यंत व्याप्ती असलेल्या इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : महाराष्ट्रातील चंद्रपूरपासून ते इगतपुरीपर्यंत व्याप्ती असलेल्या इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी चोपडा येथील भगिनी मंडळ संस्थेच्या सहसचिव तथा नगरसेविका अश्विनी गुजराथी यांची निवड झाली. नुकताच चोपडा येथे झालेल्या पदग्रहण समारंभात त्यांनी पदभार स्वीकारला. चोपड्याच्या इतिहासात एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी संधी मिळालेल्या त्या प्रथमच महिला आहेत.

समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या समारंभात अश्विनी गुजराथी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत मावळत्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. यावेळी मंचावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, इनरव्हीलच्या प्रमुख पदाधिकारी डॉ. रश्मी शर्मा हे प्रमुख अतिथी होते. त्यांच्यासमवेत मंचावर इनरव्हीलच्या पदाधिकारी मीनल लाठी, गिरीशा ठाकरे, शीला देशमुख, गौरी धोंड, रमा गर्ग व रोट्रॅक्टचे लोकेश बंसल हे उपस्थित होते. या समारंभास प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनीही ऑनलाइन उपस्थिती देत नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अरुणभाई गुजराथी यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. पदग्रहण सोहळ्याचे सूत्रसंचालन शुभ्रा व्यास व प्रीती दोषी यांनी केले तर आभार अंकिता जैन यांनी मानले. प्रारंभी महिला मंडळ शाळेच्या शिक्षिकांनी स्वागत गीत सादर केले तर अवनी गुजराथी यांनी उपस्थितांसमोर गणेश वंदना प्रस्तुत केली. या सोहळ्यास इनरव्हील डिस्ट्रिक ३०३ मधील सुमारे ६० महिला प्रतिनिधी प्रत्यक्ष तर सुमारे २०० प्रतिनिधी ऑनलाइन उपस्थित होत्या.