शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 19:27 IST

राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसंजय धोंडगे व अ‍ॅड.रवींद्र पाटील यांची मागणीदिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढतेयत्या तुलनेत सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होतेतुटपुंजे पास दर्शनासाठी मिळतात

मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे.यंदा आषाढीची वारी १२ जुलै रोजी आहे. या आषाढी वारीसाठी संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा ८ जून रोजी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा, ९ जून रोजी श्रीक्षेत्र शेगावहून, संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा १६ जून रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २४ जून रोजी श्रीक्षेत्र देहूहून, संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा २४ जून रोजी श्रीक्षेत्र पैठणहून, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २५ जून रोजी श्रीक्षेत्र आळंदीहून तर संत सोपानकाकांचा पालखी सोहळा ३० जून रोजी श्रीक्षेत्र सासवडहून प्रस्थान ठेवीत आहेत .संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक पुणे येथे विधानभवनात होते तर राज्यातील इतर पालखी सोहळ्यांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होते. पंढरपूर येथे आषाढी वारीपूर्वी सोलापूरचे पालकमंत्री बैठक घेतात परंतु त्यामध्ये राज्यातील पालखी सोहळ्यांच्या नियोजनापेक्षा स्थानिक प्रश्नाकडेच अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे राज्यातील पालखी सोहळ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होते.संत मुक्ताबाईं व संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा जळगाव, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून येतो. या पालखी सोहळ्याचा प्रवास सुमारे एक महिन्यापेक्षा अधिक असतो. या सोहळ्याबरोबर सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक वारकरी असतात. संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा नाशिक, अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून येतो. या पालखी सोहळ्याबरोबर सुमारे एक लाख वारकरी असतात तर संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करतो. या पालखी सोहळ्या बरोबर सुमारे ५० हजार वारकरी असतात.आषाढी वारीसाठी येणाºया या पालखी सोहळ्यांसमोर वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सुरक्षा, गॅस, रॉकेल व पंढरपूर येथे आल्यानंतर मिळणारे तुटपुंजे दर्शन पास या सर्व अडचणी असतात. या अडचणीकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा सीमेवर प्रशासन सज्ज असते. सर्व सुविधा शासन पुरविते मग इतर संतांच्या बाबतीतच असा दुजाभाव का? या सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांनाही मिळाल्या पाहिजेत.दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित समाजही सोहळ्यात येऊ लागला आहे. त्यामुळे मुक्कामाच्या जागाही कमी पडू लागल्या आहेत. संत ज्ञानदेव, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याला ज्याप्रमाणे सुविधा दिल्या जातात तशा सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांना मिळावी यासाठी राज्यातील पालखी मार्गावरील जिल्हा प्रशासनाची व पालखी सोहळा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व संजय महाराज धोंडगे यांनी केली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर