शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देशामध्ये चित्र बदलत असल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणे अशक्य- शरद पवार

By संजय पाटील | Updated: June 16, 2023 15:51 IST

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 

अमळनेर (जि.जळगाव) : देशामध्ये विविध राज्यांचे चित्र बदलत आहे.  सत्ताधारी पक्षाला मतदार जागा दाखवत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतील, असे वाटत नाही,  असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी अमळनेरात झाले. यातील  पहिले सत्र आटोपल्यावर आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची  पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. ईव्हीएम मशीनबाबत विचारले असता ते म्हणाले की,   दिग्विजयसिंग यांनी ईव्हीएम द्वारे निकाल बदलले जाऊ शकतात,  असे सिद्ध केले आहे,  आणि म्हणूनच निवडणुकीची जुनी पद्धत असावी, अशी आमची मागणी आहे. 

 भाजपच्या विरोधात देशभरातील सर्व पक्ष समान कार्यक्रमावर एकत्र येऊन लढणार आहोत. आणि हा कार्यक्रम ठरविण्याच्यावेळी जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. सत्ताधारी पक्ष आणि देशपातळीवरील त्यांची विचारधारा सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. समान नागरी कायद्याचा प्रस्ताव अद्याप सभागृहात चर्चेला आला नाही, त्यात काय मुद्दे असतील हे जेव्हा समोर येईल, तेव्हा त्यावर योग्य चर्चा करता येईल.

 कर्नाटकात शालेय अभ्यासक्रमातून हेडगेवार यांचा धडा वगळण्यात आला. त्यावर भाजप टीका करत आहे, यावर पवार म्हणाले की, लहान मुलांचे वय हे संस्कारक्षम वय असते. आणि त्यांच्या मनावर योग्य परिणाम होतील अशा प्रकारचे लिखाण अभ्यासात असले पाहिजे. कर्नाटकात निवडणुकीपूर्वी हा विषय जाहीरनाम्यात दिला होता.राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकरी मालाला कपाशीला भाव नाही यावर त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा सरकारने केली मात्र सरकार कमी भाव देत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही.  त्यामुळे शासनाने एजन्सीमार्फत माल खरेदी करावा किंवा शेतकऱ्यांना अनुदान तरी द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार