शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाळू व्यावसायिकांविरुद्ध शस्त्र जप्तीचे ‘अस्त्र’

By admin | Updated: May 19, 2017 13:55 IST

एमपीडीएची कारवाई प्रस्तावित असून काही जणांकडे असलेले रिव्हॉल्वर जप्त केले जाईल

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 19 - कर्मचा:यांच्या अंगावर वाहने घालणे, त्यांना धमकावणे, अवैधरित्या वाळूचा उपसा करणे असे प्रकार वाढल्याची गंभीर दखल घेऊन  अशी कृत्ये करणा:या वाळू व्यावसायिकांवर एमपीडीएची कारवाई प्रस्तावित असून काही जणांकडे असलेले रिव्हॉल्वर जप्त केले जाईल व शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वाळूच्या अनधिकृत उपशाचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याने याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिका:यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यात प्रथम त्यांनी स्वत: गिरणानदी पात्रात जाऊन तेथील परिस्थितीचे अवलोकन केले. बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप व्यक्तींचे बळी वाळू डंपर व ट्रॅक्टरमुळे जातात. जळगावातील कल्याणी नगरातील देवांश कैलास भदाणे (वय 3) या निष्पाप बालकाचा गेल्या 19 एप्रिल रोजी बळी गेला होता. या प्रकाराची बाल हक्क आयोगाने दखल घेऊन जिल्हाधिका:यांना अहवाल देण्याचे आदेश केले आहेत. याबाबत माहिती घेणे सुरू असून आठवडाभरात  बाल हक्क आयोगाला अहवाल पाठविला जाईल असे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले. वाळू वाहतूक बंद केल्याचे संघटनेकडून सांगितले जाते मात्र कारवाईत वाहने जप्त होत  आहेत.  असे सांगून निंबाळकर म्हणाले,  जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री 9 वाजता धरणे आंदोलन करून दबाव निर्माण करणे हे सहन केले जाणार नाही. आता दादागिरी करणा:या व कर्मचा:यांच्या अंगावर वाहने नेणा:यांवर एमपीडी अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाईल. तर रिव्हाल्वर जप्तकाही वाळू व्यावसायिकांकडे रिव्हॉल्वरही आहेत. त्यांच्याकडील हे शस्त्र जप्त केले जातील. तसेच त्यांच्याकडे असलेले शस्त्र परवानेही जप्त केले जातील.  अधिकृत ठिकाणी नियम पाळणा:यांची वाहने अडविली जाणार नाहीखडी क्रेशर, वीट भट्टी व्यावसायिकांवरही होणार कारवाई आर.टी.ओ. च्या मुंबई येथील पथकाकडूनही होणार कारवाई.