शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे क्षेत्र यंदाही ५ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

- जिल्ह्याचे एकूण क्षेत्र -८,१०,५०७ (हेक्टर) -गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र - ७, ७५, ५५० - यावर्षी पेरणीचा अंदाज - ...

- जिल्ह्याचे एकूण क्षेत्र -८,१०,५०७ (हेक्टर)

-गेल्यावर्षी पेरणी झालेले क्षेत्र - ७, ७५, ५५०

- यावर्षी पेरणीचा अंदाज - ७,७७,३४७

- यंदा कापसाची पेरणीचा अंदाज - ५, लाख, ३५ हजार हेक्टर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही मान्सून सरासरी इतका राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे बळीराजाने खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात ५ टक्क्यांची वाढ होण्याचा तर मक्याच्या लागवड क्षेत्रात मात्र यावर्षी पाच ते सहा हजार हेक्‍टरने घट होण्याचाही अंदाज कृषी विभागाकडून प्राथमिक स्तरावर व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के खरीपाची पेरणी होणार आहे.

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील कृषी विभागाने बियाणे व खतांबाबत नियोजन आखले होते. मात्र ऐन वेळी साठेबाजी मुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी ताटकळत बसावे लागले होते.

३ हजार हेक्टर क्षेत्र वाढणार

गेल्या वर्षी दोन वर्षांपासून जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या काळातील नियमितच्या सरासरीपेक्षा १३० ते १४५ टक्के पाऊस झाला होत आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे गेल्या दोन वर्षांपासून खरीप हंगामाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यंदा स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने जिल्ह्यात ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षाच्या ७ लाख ७५ हजार ५५० हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा ७ लाख ७८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण क्षेत्र ८ लाख १० हजार ५०७ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी, सरासरी ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.

५ लाख हेक्टरवर होणार कापसाची पेरणी

जिल्ह्यात खरीपाचे मुख्य पीक हे कापसाचेच आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ५ लाख २० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यंदा काही प्रमाणात क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, यावर्षी ५ लाख ३५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बोंडअळीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान , आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी यावर्षी वाढणार असल्याने देखील शेतकऱ्यांकडून कापूस लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार

यंदाच्या खरीप नियोजनानुसार सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे क्षेत्र पूर्णपणे वाया गेले होते. मात्र यावर्षी भाव चांगले राहण्याची शक्यता असल्याने, सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये पाच ते सहा हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्यता आहे. तर मूग व उडीद चे क्षेत्र यंदाही गेल्या वर्षा इतकेच राहण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या वर्षी उडीद व मूगाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मक्याचा क्षेत्रात मात्र यावेळेस घट होण्याची शक्यता आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू वाढत असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा मक्या वर फवारणी करावी लागते. त्या बाजारात भाव देखील फारसा नसल्याने शेतकऱ्यांकडून यंदा मका लागवड क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे

पालकमंत्री घेणार ७ रोजी आढावा

जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तयारीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे ७ मे रोजी आढावा घेणार आहेत. गेल्यावर्षी बियाणांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासली होती, त्यामुळे यावेळेस कोरोना च्या काळात शेतकऱ्यांची फिरफिर होऊ नये म्हणून बियाणांची मुबलकता करण्याबाबत पालकमंत्री सूचना देणार आहेत.