शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक विवंचना व वेदना असह्य झाल्याने ‘त्याने’ घरीच कापला पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 16:02 IST

जळगाव जिल्ह्यातील सावखेडासीम येथील रुग्णांने घेतला टोकाचा निर्णय

ठळक मुद्देजहांगिर तडवी या ट्रॅक्टरचालकाला जून महिन्यात सुरु झाला होता त्रासपायी चालणे बंद झाल्याने कुटुंबियांनी फैजपूर, सावदा व भुसावळ येथे केले उपचारवेदना असह्य होत असल्याने तसेच आर्थिक परिस्थिती नसल्याने जहांगिर तडवी यांनी चुलत भावाच्या मदतीने 21 जुलै रोजी पाय कापला.निकामी पाय कापल्यामुळे त्रास कमी असला तरी मोठय़ा रुग्णालयात उपचाराची गरज असल्याचे सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका:यांचा सल्ला.

ऑनलाईन लोकमत दहिगाव, जि.जळगाव,दि.26 - पायाच्या वेदना असह्य होत असताना, चार रुग्णालयाकडून उपचार घेऊनही पाय दुरुस्त न झाल्याने अखेर आर्थिक अडचणींमुळे जहांगीर बाबू तडवी या रुग्णाला घरी परत लागले. वेदना असह्य होत असल्याने शेवटी स्वत:चा पाय चाकूने चुलत भावाकडून कापून घ्यावा लागला. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असली तरी वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सावखेडासीम येथील जहांगीर बाबू तडवी हा ट्रॅक्टरचालक आहे. 29 जून रोजी अचानक त्याच्या डाव्या पायांच्या रक्तवाहिनीतील रक्त गोठल्यासारखे झाले. परिणामी त्याचे पायी चालणे बंद झाले. त्याला कुटुंबीयांनी फैजपूर, सावदा, भुसावळ येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ नेले होते. मात्र, पायाचे दुखणे कायम होते. शेवटी जळगाव येथील डॉ.चेतन काकलिया यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांनीही पायाची दुरुस्ती होणार नाही, म्हणून मुंबई, औरंगाबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. मात्र, आर्थिक संकट, जेमतेम परिस्थिती असल्याने तो घरीच परतला. 21 रोजी पायाच्या पोटरीत पल्स वाढल्याने त्यातील मांस पूर्ण कुजलं आणि पाय गुडघ्यापासून अचानक गळाला. वेदना खूप होत असल्याने जहांगिर यांचा चुलतभाऊ अकबर हसन तडवी याने धारदार चाकूने पाय कापला व तत्काळ त्याचे पायाचे ड्रेसिंग करून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे केले. पाय कापल्याने रुग्णाची प्रकृती चांगली आहे. सध्या त्याच्यावर सावखेडासीम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत बारी प्राथमिक उपचार करीत आहेत. जहांगीरने घरच्या घरी पाय कापला, हे चुकीचे आहे. ते घातकही ठरू शकते. त्याच्यावर प्राथमिक उपचार करीत आहे. त्यामुळे वाढणारा त्रास कमी झाला आहे. मात्र, त्याला मोठय़ा रुग्णालयात उपचार घेण्याची नितांत गरज आहे. - डॉ. उमाकांत बारी, सावखेडासीम