शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील समांतर रस्त्याच्या कामाला एप्रिलचा मुहूर्त, जिल्हाधिका-यांनी दिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 13:29 IST

समांतर रस्ते कृती समितीच्या आंदोलनाला यश

ठळक मुद्दे50 मिनिटे रस्तारोकोशालेय विद्याथ्र्यासह हजारो शहरवासीयांचा सहभाग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10- जळगाव शहरातून जाणा:या  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या समांतर रस्त्याचे काम एप्रिल अखेर करण्यात येईल, असे लेखी पत्र जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी समांतर रस्ते कृती समितीच्या तटस्थ निरीक्षकांना दिले. यामुळे शहरातील हा ज्वलंत प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, या समांतर रस्त्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वर समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर तब्बल 50 मिनिटे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाना जिल्हा प्रशासनाच्या पत्राने यश आल्याचे मानले जात आहे. जळगाव शहरातील 5 लाख नागरिकांच्या जीवन मरणाचा ज्वलंत विषय बनलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चा विस्तार व समांतर रस्ते विकास यासाठी बुधवार, दि. 10 जानेवारीस समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 10.45 वाजता रस्तारोकोस सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांना समितीच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जोर्पयत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तो र्पयत आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम होते. त्यावेळी जिल्हाधिका:यांनी मंजूर झालेल्या 100 कोटींच्या कामातून कोणकोणती कामे करण्यात येणार आहे, याची माहिती दिली व तसे लेखी पत्र कृती समितीच्या तटस्थ निरीक्षकांकडे दिले. त्यानंतर 50 मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले.  आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. महामार्गावर कोणताही गोंधळ व अनुचित प्रकार न होता आंदोलन शिस्तबद्धतेत व शांततेत पार पडले. 

समांतर रस्त्यांचा मागणीसाठी जळगावकरांची ‘वज्रमुठ’शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांचे काम सुरु करण्यात यावे या मागणीसाठी समांतर रस्ता कृतीसमितीच्या वतीने बुधवारी शहरातील अजिंठा चौकात ‘महामार्ग रोको’ आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात 2 हजारहून अधिक शालेय विद्यार्थी व हजारो जळगावकरांनी सहभागी घेवून, ‘समांतर रस्ते झालेच पाहिजे’ असा हुंकार भरत, प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हाधिका:यांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलकांना लेखी हमी दिल्यानंतर या आंदोलनाचा समारोप झाला.  या आंदोलनासाठी जळगावकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळी 9.30 वाजेपासून शालेय विद्याथ्र्यानी हातात विविध घोषणांचे फलक घेवून, आपल्या शिक्षकांसह अजिंठा चौकात जमायला सुरवात केली होती. तर सर्वसामान्य नागरिक देखील सकाळी 10 वाजेर्पयत या ठिकाणी जमले होते. 10.45 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. ‘समांतर रस्ते झालेच पाहिजे’, ‘अभी तो ली अंगडाई है, असली लडाई बाकी है’,  अशा घोषणांनी संपूर्ण अजिंठा चौक आंदोलकांनी दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान जाणा:या रुग्णवाहिका व अंत्ययात्रेला आंदोलकांनी मार्ग करुन दिला. तसेच आंदोलनादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही अनुचित कार्य आंदोलकांनी केले नाही.