शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पाडळसे प्रकल्पाच्या आर्थिक तरतुदींसाठी गुंतवणूक मान्यता समितीचीही मान्यता द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:20 IST

दिल्ली येथे केंद्रीय जलायोगाच्या बैठकीत टप्पा दोनच्या पाणी साठ्यालाही मान्यता मिळण्याची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : दिल्ली येथे केंद्रीय जलायोगाची बैठक २८ रोजी होत असून, निम्न तापी प्रकल्प पाडळसेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता देताना दुसऱ्या टप्प्याच्या पाणी साठ्याला व आर्थिक तरतुदींसाठी गुंतवणूक मान्यता समितीकडे शिफारस करून पुढील कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मेल व ट्विट करून केली आहे.दिल्ली येथे केंद्रीय जलायोगाची बैठक होत असून या बैठकीत निम्न तापी प्रकल्प ला जलायोगाची मान्यता मिळण्याची शक्यता आह,े मात्र यात फक्त टप्पा एकला मान्यता मिळेल दुसºया टप्प्याच्या पाणी साठ्यालाही मंजुरीची आवश्यकता आहे व तांत्रिक समितीची मान्यता मिळाली तरी तालुक्याची परिस्थिती पाहता आर्थिक तरतुदीलाही मान्यतेची ताबडतोब गरज आहे. निम्न तापी प्रकल्पाचा सुधारित अहवालानुसार जळगाव-धुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडा व धुळे या तालुक्यातील ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सरकारी उपसा सिंचन पद्धतीने सिंचित करण्याचे नियोजन आहे. पाणीसाठा १४.८५ टीएमसी असून उपयुक्त साठा १४.३९ टीएमसी आहे, परंतु प्रथम टप्प्यात फक्त १०.४० अब्ज घनफुट पाणी साठा करण्यात येणार आहे. तापी खोºयाच्या सुधारित बृहत आराखड्यानुसार महाराष्ट्रात तापी खोºयात १९१.४० अब्ज घनफुट पाण्याव्यतिरिक्त एकूण ३१.९१ अब्ज घनफुट पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्रास मिळणाºया अतिरिक्त ३१.९१ अब्ज घफु पाण्याव्यतिरिक्त ४.०७ अब्ज घनफुट पाण्याच्या तरतुदीसह सतत अवर्षण प्रकल्प क्षेत्र असलेल्या भागातील रखडलेला निम्न तापी प्रकल्प केंद्रीय आयोगाच्या लाभवैय गुणोत्तराच्या निकषानुसार लाभक्षेत्र गुणोत्तर १.६९ हेक्टर इतके असलेल्या सिंचन प्रकल्प लाभ क्षेत्रातील कायमस्वरूपी अवर्षणाची सौम्यता समस्या कमी करण्यासाठी सिंचन क्षमता व निर्मित सिंचन क्षमता यातील समतोल विकासासाठी एकात्मिक राज्य जल आराखड्यानुसार रखडलेला निम्न तापी प्रकल्प तापी बृहत आराखड्यातील तरतुदीनुसार नियोजित टप्पा १ पाणीसाठा ९.३१ अब्ज घनफुट आणि भविष्यकालीन नियोजन टप्पा २ पाणी साठा ५.५४ अब्ज घनफुट प्रशासकीय मान्यता पूर्ण पाणी १४.८५ उपलब्धतेसह अहवालानुसार केंद्रीय जलायोगाच्या तांत्रिक मूल्यांकन समितीच्या बैठकीत मान्यता घेऊन प्रकल्पाच्या आर्थिक तरतुदींसाठी गुंतवणूक मान्यता समितीकडे शिफारशीसह कार्यवाही व मंजुरीसाठी पाठवावी, अशी मागणी नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, जलआयोगाचे चेअरमन, जलायोगाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकाºयांकडे केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAmalnerअमळनेर