शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांना मोक्का लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 12:23 IST

तितूर नदीपात्रालगत हिंगोणेवासियांचे उपोषण

ठळक मुद्दे गुरुवारी पुन्हा झाला पंचनामा

चाळीसगाव: हिंगोणे सीम गावालगत असणा-या तितूर नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणा-या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन त्यांची संपत्तीही जप्त करावी. या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून त्यांनी तितूर नदीपात्रालगत उपोषणासाठी ठिय्या मांडला आहे. वाळू तस्करी प्रकरण चांगलेच तापल्याने प्रशासन काय भूमिका घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान पुन्हा पंचनामा झाल्याने महसुल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले जात आहे.२२ रोजी पहाटे चार वाजता स्वत: ग्रामस्थांनी वाळू चोरीचा प्रकार समोर आणला. गेल्या वर्षभारापासून तितूर नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतुक होत असल्याच्या तक्रारी गावक-यांनी महसुल विभागाकडे केल्या होत्या. वाळू उपसा करण्यात येऊ नये. असा ठरावही ग्रामपंचायतीने केला आहे. मात्र त्याची दखल न घेतल्याने वाळू तस्करांची मुजोरी वाढली होती. यानंतर भाजपाचा माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी याच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. गुरुवारी पुन्हा झाला पंचनामा२२ रोजी झालेल्या पंचनाम्याबाबत ग्रामस्थांनी शंका उपस्थित करुन आक्षेपही घेतल्याने गुरुवारी दुपारी चार वाजता चाळीसगाव विभागाचे प्रांताधिकारी शरद पवार यांच्या उपस्थित सार्वजनिक पाटबंधारे विभागाने वाळू उपसा झालेल्या जागेचा स्थळ पंचनामा केला. दुपारी चार पर्यंत हे मोजमाप सुरु होते. यावेळीही अधिका-यांसमोर गावक-यांनी वाळू वाहतूक करणा-यांवर कठोर करण्याची संतप्त मागणी केली. उपोषण स्थळी माजी सरपंच ज्ञानेश्वर महाजन, अरविंद चव्हाण, बाळासाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित आहे.# आज दुपारी अहवाल येणार५२ घनफूट की १५ लाख घनफूट वाळू उपसा झाला ? हे सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी गुरुवारी स्थळ पंचनाम्यावरुन समोर येणार आहे. हा अहवाल शुक्रवारी दुपारी ते प्रांताधिका-याकडे सादर करणार असल्याने अहवालात काय दडले आहे. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे....हिंगोणे सीम तितूर नदीपात्रात वाळू उपसा झालेल्या जागेचा गुरुवारी पुन्हा पंचनामा करण्यात आला. शुक्रवारी दुपारी सार्वजनिक पाटबंधारे विभागाकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.- शरद पवारप्रांताधिकारी, चाळीसगाव विभाग