सदर समिती २ सप्टेंबरपासून ताप्ती सेक्शनअंतर्गत सुरत उधना बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर व धरणगाव आदी स्थानकांचे निरीक्षण करीत आहे. नंदुरबारपर्यंत आधीचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर दि. 4 पासून नंदुरबारपासून दुसरा पुढील टप्पा सुरू होत आहे. या समितीत सदस्य म्हणून डॉ. राजेंद्र फडके, जळगाव, छोटूभाई पटेल, सुरत, कैलास वर्मा, मुंबई, विभा अवस्थी, रायपूर (छत्तीसगड) आणि गिरीश राजगोर आदींचा समावेश आहे. अमळनेर परिसरातील ज्या प्रवासी बांधवांना रेल्वेबाबत समस्या असतील त्यांनी त्या हिंदी अथवा इंग्रजीमध्ये लिहून ४ रोजी दुपारी १२ वाजता रेल्वे स्थानकावर भेटावे असे आवाहन रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य तथा भाजपचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी केले आहे.
रेल्वेस्थानकावरील तक्रारी सादर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST