शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गितांजली केमिकल्समधील दुस-या कामगाराचीही प्राणज्योत मालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:58 IST

अंगावर गरम केमिकल्स पडून भाजून गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बळीराम तिवनकर (वय ५० रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या कामगाराचा गुरुवारी पहाटे २. ४० वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. दरम्यान, तिवनकर यांच्या वारसांना मदत व ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दरम्यान,संभाव्य वाद लक्षात घेता कंपनी प्रशासनाने नियमानुसार मदत व मुलास कायमस्वरुपी नोकरी देण्याचे लेखी दिल्याने नातेवाईकांचा रोष कमी झाला.  

ठळक मुद्देठोस आश्वासन व मदतीसाठी नातेवाईक आक्रमक मुलाला कायमस्वरुपी नोकरीचे दिले लेखी आश्वासन पोलिसांनी मध्यस्थी करुन मिटविला वाद

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २ : अंगावर गरम केमिकल्स पडून भाजून गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बळीराम तिवनकर (वय ५० रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या कामगाराचा गुरुवारी पहाटे २. ४० वाजता उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. दरम्यान, तिवनकर यांच्या वारसांना मदत व ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दरम्यान,संभाव्य वाद लक्षात घेता कंपनी प्रशासनाने नियमानुसार मदत व मुलास कायमस्वरुपी नोकरी देण्याचे लेखी दिल्याने नातेवाईकांचा रोष कमी झाला.  आठवडाभरातील दुसरा मृत्यूएमआयडीसीतल गितांजली केमिकल्स या कंपनीत सुनील चिंतामण चौधरी (वय २७, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव मुळ रा.उदळी, ता.रावेर)व प्रकाश बळीराम तिवनकर (वय ५० रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव, मुळ रा.साकेगाव, ता.भुसावळ) हे दोन्ही जण २६ आॅक्टोबर रोजी सकाळ सत्रात कामाला होते. उत्पादन विभागात काम सुरु असताना सकाळी दहा वाजता वरच्या माळ्यातील लूक रिअ‍ॅक्टरमधील गॅसचा पाईप फाटला व त्यातून गरम केमिकल्स सुनील व प्रकाश यांच्या अंगावर पडले. या घटनेत दोन्ही जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना २८ रोजी रात्री सव्वा दहा वाजता सुनील याचा मृत्यू झाला, तर प्रकाश यांची मृत्यूशी झुंज सुरुच होती. गुरुवारी पहाटे २.४० वाजता त्यांचा श्वास थांबला.