शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

निवडणूक कामासाठी नियुक्त आणखी एका शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 19:45 IST

चाळीसगाव येथील घटना

कळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या आणखी एका शिक्षकाचा परतताना मृत्यू झाल्याची दुसरी घटना शनिवारी सायंकाळी चारला चाळीसगाव येथे घडली. अंबादास बळीराम चौधरी (वय ५४, रा.श्रीरामनगर, अमळनेर) असे या शिक्षकाचे नाव आहे.अंबादास चौधरी हे निवडणूक प्रशिक्षणासाठी चाळीसगावला गेलेले होते. निवडणूक प्रशिक्षण आटोपून ते घरी अमळनेरकडे येण्यासाठी निघाले. मात्र चाळीसगाव येथे बसस्टॅण्डकडे जाताना रस्त्यात चक्कर येऊन पडले. तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.याआधी जामनेर येथील शिक्षक रामदास माणिक जाधव (वय ५१, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) यांचा जळगाव बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला होता.अमळनेरला ढेकूसीम रोडवरील श्रीराम नगरात ते रहात होते. तेथेच त्यांनी आळंदी संस्थानचे अध्यक्ष मोठे बाबा यांचे लोकवर्गणीतून मंदिर बांधले आहे. ह.भ.प.अंबादास महाराज तावसेकर या नावाने ते ख्यातनाम कीर्तनकार होते. ते मूळचे चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रूक येथील रहिवासी आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.