शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर पुन्हा अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:07 IST

एक गंभीर जखमी

जळगाव : परप्रांतीयांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने जळगावनजीक पाळधी येथून येणाºया दोघं भावांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महेंद्र रमेश पाटील (वय-३६, दोन्ही रा. पाळधी, ता.धरणगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याचा भाऊ प्रल्हाद रमेश पाटील (वय-३०) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समोर झाला. जखमीस शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.महेंद्र रमेश पाटील (वय-३६) आणि प्रल्हाद रमेश पाटील (वय-३०, दोन्ही रा. पाळधी ता.धरणगाव) हे दोन्ही भाऊ चहा पावडरचा खेडोपाडी जावून व्यवसाय करतात. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बांभोरी येथे कामाच्या निमित्ताने दोघे सोबत वेगवेगळ्या दुचाकीने जात असताना परप्रांतीयांना घेवून जाणाºया ट्रकने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गेट समोर मागून जोरदार धडक दिली. यात महेंद्र पाटील जागीच ठार झाला तर प्रल्हाद पाटील हा गंभीर जखमी झाला. अपघात होताच परिसरातील नागरिक व महामार्गावरील वाहनधारकांनी धाव घेतली. जखमी प्रल्हाद पाटील याला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मयत महेंद्रचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात दोन भाऊ, आई-वडील असा परीवार आहे. अपघातप्रकरणी पाळधी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.दरम्यान, ट्रकने धडक दिल्याने एक ठार झाला आहे हे लक्षात येताच ट्रक चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.