शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

पारोळा येथे आढावा बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार न केल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:41 IST

पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती रेखाबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाची आढावा व मासिक बैठक झाली. नवनिर्वाचित सभापतींच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत-सत्कार होणे अपेक्षित होते. पण प्रशासन व अधिकाºयांनी हा प्रोटोकॉल पाळला नाही. परिणामी सभापती रेखाबाई भिल व उपसभापती अशोक पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

पारोळा, जि.जळगाव : येथील पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती रेखाबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाची आढावा व मासिक बैठक झाली. नवनिर्वाचित सभापतींच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत-सत्कार होणे अपेक्षित होते. पण प्रशासन व अधिकाºयांनी हा प्रोटोकॉल पाळला नाही. परिणामी सभापती रेखाबाई भिल व उपसभापती अशोक पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.८ रोजी दुपारी १ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या वेळी त्या त्या अधिकारी वर्गाने आपापल्या विभागाचा आढावा सादर केला. मंजूर कामे, बंद पडलेली कामे, सुरू असलेली कामे आणि पूर्ण झालेली कामे, ही माहिती दिलीशिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी १४ ग्रेडेडे मुख्याध्यापक, २३ पदवीधर, १० शिक्षक, २ केंद्रप्रमुख, १ विस्तार अधिकारी अशी ३९ रिक्त पदे असल्याची माहिती दिली, तर शालेय पोषण आहार योजनेच्या अधीक्षक प्रीती पवार यांनी तालुक्यातील पोषण आहार योजनेची माहिती या वेळी दिलीतर कृषी अधिकारी यांनी तालुक्यात ५२ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यावरील १०० टक्के पंचनामे झाली आहेत व तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्याचे सांगितले.एका बाजूला बसेससाठी विद्यार्थी महामार्गावर रास्ता रोको करतात. पण एस.टी. महामंडळाचे अधिकारी म्हणून आलेले कर्मचारी मात्र बसेस वेळेवर सोडण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देतात. यामुळे एकच आश्चर्य व्यक्त केले गेले.या वेळी पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी, बांधकाम, समाजकल्याण, शालेय पोषण आहार, स्वछ भारत अभियान, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय एरंडोल, वीज वितरण कंपनी, सामाजिक वाणीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, उपविभागीय जलसंधारण विभाग, पाणीटंचाई आढावा, लघु पाटबंधारे विभाग या विभागाचा आढावा त्या-त्या विभागप्रमुखाने या वेळी सादर केला.बैठकीस सदस्य ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील, सुजाता बाळासाहेब पाटील, सुनंदा पांडुरंग पाटील, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे, सहायक ए.बी.अहिरे आदी उपस्थित होते.गैरहजर सदस्यया बैठकीला प्रमोद जाधव, सदस्या छाया पाटील, छाया राजेंद्र पाटील हे तीन सदस्य गैरहजर होते.

टॅग्स :GovernmentसरकारParolaपारोळा