शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी परीक्षांचा अर्ज सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१मधील उन्हाळी सत्रातील मे, जून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१मधील उन्हाळी सत्रातील मे, जून, जुलै २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, परिसंस्थांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावले जाऊ नये, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे अर्ज सादर करते वेळी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण उद्भवू नये तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने परीक्षा समन्वयकाची नियुक्ती करावी. परीक्षा समन्वयकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरिता महाविद्यालयाची, बँकेची माहिती, अकाऊंट नंबर, आयएफएससी कोड इत्यादी बाबी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द कराव्यात. विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण ज्या त्या महाविद्यालयाने त्यांचे स्तरावर करावे. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच विद्यापीठाचे मार्गदर्शन घ्यावे,अशा सूचना विद्यापीठाने केल्या आहेत.

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्यासाठी सुविधा

कोविड-१९ च्या अनुषंगाने महाविद्यालयांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज व ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी डिजिटल युनिर्व्हसिटी पोर्टल वर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म सबमिशन या सुविधेव्दारे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याबाबत कळवावे. परीक्षा अर्ज भरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलवू नये व विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षा अर्ज भरण्याकरिता महाविद्यालयात जाऊ नये, अशा सूचना केल्या आहेत.

यू.पी.आय.व्दारे भरणा शक्यतो टाळावा

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरताना शक्यतो डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करावा. यू.पी.आय.व्दारे भरणा शक्यतो टाळावा. विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमधून फी डेबिट झाली तथापि फॉर्म भरला गेला नसेल तर पुन्हा पेमेंट करू नये. अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म तीन ते चार दिवसांमध्ये बँक रिकन्सिलेशन झाल्यानंतर ऑटो सबमिट होईल त्यासाठी पुन्हा फी भरण्याची विद्यार्थ्यांनी घाई करू नये. अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी.पाटील यांनी दिली आहे.