शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दररोज 100 जणांना अन्नदान

By admin | Updated: May 18, 2017 13:32 IST

शहरातील काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरासमोर दररोज सकाळी 11 वाजता गरजू भरपेट जेवण

विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 18 - कुणीही उपाशी राहू नये, त्यांना किमान एक वेळचे तरी जेवण मिळावे, या उद्देशाने जैन श्वेतांबर मूर्तीपूजक खरतर गच्छ संघातर्फे दररोज 100 जणांना अन्नदान केले जात आहे. शहरातील काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरासमोर दररोज सकाळी 11 वाजता गरजू भरपेट जेवण करून तृप्ततेचा ढेकर देत अन्नदात्यांना आशीर्वाद देत असल्याची अनुभूती दररोज येत आहे. भूक शमली जाऊन पोट भरलेले असेल तर मनात चांगले भाव येतात या साध्वी श्री विश्वज्योतीजी. म.सा. यांच्या शिकविणीची प्रेरणा घेऊन जैन श्वेतांबर मूर्तीपूजक खरतर गच्छ संघाने 1 मे, या महाराष्ट्र दिनापासून दररोज किमान 100 लोकांना तरी अन्नदान करण्याचा निर्णय घेत हा उपक्रम सुरू केला आहे. दररोज सकाळी पोटभर जेवणश्री वासुपूज्य जैन मंदिरासमोर 1 मे पासून गरजूंच्या पोटाला आधार मिळू लागला असून त्यांच्यासाठी संघातर्फे दररोज जेवणाचे पाकीट तयार ठेवले जातात. यामध्ये भाजी, सहा पोळ्य़ा, वरण-भात यात कधी पुलाव, खिचडी दिली जाते. विशेष म्हणजे सणाच्या दिवशी मिठाईदेखील दिली जाते. तृप्ततेचा ढेकरदररोज ठिकठिकाणी अन्नासाठी भटकंती करूनही पोटात अन्नाचा एक कण जात नसताना आता दररोज पोटभर जेवण मिळू लागल्याने दररोज 100 जण तृप्ततेचा ढेकर देत आहे. इतर ठिकाणचीही पाहणी सुरूरेल्वे स्थानक, बसस्थानक, जिल्हा रुग्णालय, इतर मंदिर अथवा ज्या ठिकाणी 100 जण येऊ शकतील अशा ठिकाणची सध्या संघाच्यावतीने पाहणी सुरू असून या ठिकाणी हे अन्नदान करण्याचा संघाचा मानस आहे. या पाहणी नंतर प्रत्येक ठिकाणी कधी जेवण द्यायचे याचा दिवस ठरविला जाणार आहे. हा उपक्रम प्रथम गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात येणार होता, मात्र संपूर्ण नियोजन झालेले नव्हते. त्यानंतर अक्षयतृतीयेपासून त्याची सुरुवात होणार होती, मात्र महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त निश्चित करून त्या दिवसापासून अन्नदानास सुरुवात करण्यात आली. वर्षभर चालणार उपक्रमअन्नदानाचे हे कार्य एक वर्ष सुरू राहणार असून दररोज 100 जणांना जेवण दिले जाणार असल्याचे संघाच्यावतीने सांगण्यात आले. या उपक्रमासाठी संघाचे अध्यक्ष सुमतीलाल टाटिया, सदस्य जितेंद्र छाजेड, विजय जैन, विनोद बेडर, संजय गांधी, सुरेंद्र टाटिया, किरण निमजिया, कल्पेश दोशी, विनय टाटिया हे परिश्रम घेत आहेत. दररोज कितीतरी जण भुकेले असतात. प्रत्येकाला अन्न मिळाले पाहिजे, कोणीही भूकेले राहू नये, यासाठी संघाच्यावतीने दररोज 100 जणांना जेवण दिले जात आहे. वर्षभर हा उपक्रम सुरू राहणार आहे. - संजय गांधी, सदस्य, जैन श्वेतांबर मूर्तीपूजक खरतर गच्छ संघ.