शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अंजनी धरणाने गाठली ‘पंचाहत्तरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 22:06 IST

पूर्ण भरण्याची आशा : जलसाठा चांगला झाल्याने परिसरात समाधान

एरंडोल : तालुक्याच्या दृष्टीने सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेले येथील अंजनी धरण ७४.८३ टक्के पाण्याने भरले आहे. एकूण जलसाठा ४१५ द.ल.घ.फु. आहे. धरणातील पाणीसाठ्याची उंची १० ते १५ मिटर असून पाणी साठ्या ाचा तलांक २२५.२८ मिटर आहे. अंजनी धरणाने यंदाच्या पावसाळ्यात जवळपास पंच्याहत्तरी गाठली असून शतकीय वाटचाल सुरू केली आहे.धरणातील मुबलक पाणीसाठयामुळे एरंडोल शहर व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे तसेच चार सिंचन आवर्तने सुटण्याची दाट शक्यता आहे.यामुळे जवळपास एक हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे.पूर्ण क्षेत्राला लाभ नाहीअंजनी धरणाची कालवा प्रणाली अजूनही अपूर्ण असल्यामुळे धरण भरूनही जवळपास १३ वषार्पासून सिंचनाचा लाभ पूर्ण क्षमतेने होत नाही.करोडो रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे मात्र एक दशकापेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा धरणाच्या कार्यक्षेत्रात शेतापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. याबाबत खंत व्यक्त केली जात आहे. वितरिका, उपवितरीका व शेती चाऱ्या यांची कामे झाली नाहीत. परिणामी ‘अंजनी’च्या संपूर्ण क्षेत्रात सिंचनाचा लाभ देता येत नाही.सिंचनचा अत्पल्पप्रमाणात लाभकालवा प्रणालीची शेपटी लांबल्यामुळे धरणाचे कार्यक्षेत्र सुजलाम सुफलाम होईल हे स्वप्न अजूनही साकार झाले नाही. केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प म्हणून व अत्यअल्प प्रमाणात सिंचनाचा लाभ देणारा प्रकल्प म्हणून या धरणाची ओळख झाली आहे.