शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्राणी दिन विशेष- पाटणादेवी जंगलात प्राण्यांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:08 IST

मानवी आक्रमणामुळे वन्यपशूंच्या रहिवासात अडथळा येत असल्याची बहुतांशी उदाहरणे यंदा कोरोनामुळे अपवाद ठरली आहेत.

ठळक मुद्देकोरोनाने रोखले मानवी अतिक्रमण१९ कृत्रिम पाणवठे, अन्नसाखळीही मुबलक

जिजाबराव वाघचाळीसगाव : मानवी आक्रमणामुळे वन्यपशूंच्या रहिवासात अडथळा येत असल्याची बहुतांशी उदाहरणे यंदा कोरोनामुळे अपवाद ठरली आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पर्यटनस्थळे व जंगलसफरीचीही टाळेबंदी असल्याने प्राण्यांना मुक्त संचार करण्याची संधी मिळाली आहे. पाटणादेवी जंगलातही सद्य:स्थितीत प्रवेशबंद असल्याने प्राण्यांचा मुक्तसंचार सुरू आहे.चाळीसगाव शहराच्या १८ कि.मी. अंतरावर नैऋत्यला पाटणादेवीचा हिरवा शालू परिधान केलेला निसर्गरम्य परिसर आहे. येथे दाटवृक्षराजी सोबतच दुर्मिळ वनस्पती आहेत. जंगल परिसराला सातमाळा डोंगररांगांची तटबंदी आहे. याच डोंगररांगांमधून झेपावत येणारे लहान-मोठे शुभ्रधवल धबधबे पावसाळ्यात या सौदर्याला चार चाँद लावतात. यंदा मात्र कोरोनामुळे पाटणादेवी दर्शनासह जंगल सफरीला प्रवेश बंद आहे. यामुळे जंगल परिसरात प्राण्यांना वावरण्यास मुक्त वाव मिळत आहे.एकूण सहा हजार ५०० हेक्टर जंगल परिसरात मोठ्या संख्येने प्राणी संपदा आहे. दुर्मिळ पक्षांचा अधिवास आणि वनसंपदेमुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी होत असते. यावर्षी मात्र वन्यपशूंना कोणताही संसर्ग होऊ नये. यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. मार्चपासून जंगलात फिरण्यास मनाई केली गेली असून चंडिकादेवीचे दर्शनही बंद आहे.पाटणादेवी जंगल परिसराला जोडूनच गौताळा अभयारण्याचा परिसर आहे. पाटणादेवीच्या जंगलात वन्य प्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नसाखळी उपलब्ध असून उन्हाळ्यात १९ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.११ बिबटेपाटणादेवी जंगल परिसरात ११ बिबटे असल्याची नोंद प्राणी गणनेत घेण्यात आली आहे. याबरोबरच नीलगाय, मोर, हरीण, माकडे, दीडशेहून अधिक रानडुकरे, विविध पक्षी आहेत, अशी माहिती चाळीसगाव वनविभागाचे वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम. डी.चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारChalisgaonचाळीसगाव