शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धरणगावचे ग्रामदैवत पुरातन बालाजी मंदिराचा जिर्णोध्दार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 15:07 IST

१३ रोजी कामाचे भूमीपूजन

धरणगाव-- ग्रामदेवता असलेल्या येथील २२५ वर्षापूर्वीच्या श्री बालाजी मंदिराचा जिर्णोध्दार भूमीपूजन सोहळा १३ रोजी परिसरातील संतश्रीच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी.आर.पाटील व पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत दिली.

१३ रोजी भूमीपूजन दू. ४.३० वा.श्री क्षेत्र सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प.पू.प्रसाद महाराज यांच्या हस्ते व श्री नारायण भक्तीपंथचे मुख्य प्रवर्तक प.पू.लोकेशनंदजी महाराज, रामेश्वर संस्थानचे महंत नारायण स्वामी व वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमूख महामंडलेश्वर हभप भगवान महाराज या विभूतींच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न होत मंदिराची मालकी व पुजेचा अधिकार वारसाहक्का प्रमाणे पुराणिक बंधूंचा अबाधित ठेऊन श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळ समाजाच्या सहकार्याने जिर्णोध्दार करणार आहे. आगामी २ वर्षात जिर्णोध्दाराचे काम पुर्ण करण्याचा मानस आहे. मंदिराचा आराखडा धुळे येथील आर्किटेक्ट रवि बेलपाठक हे विनामूल्य तयार करत आहे.येथील श्री व्यकटेश नागरी पतपेढीच्या सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेस उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी, अशोक येवले व मंदिराचे विश्वस्त पुराणीक कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी सांगितले की, बालाजी मंदिराला ड वर्गाचे पर्यटन स्थळ म्हणून मंजूरी मिळाली असून सभामंडप व इतर कामांसाठी २ कोटी ९१ लक्ष निधी मंजूर केला आहे. मंदीर बांधकाम लोकवर्गणीतून केले जाणार आहे. याबाबत पुराणिक कुटूंबियांशी असलेला वाद संपुष्टात आला असून बालाजी व्यवस्थापक मंडळ व पुराणिक कुटुंबियामध्ये सामजस्य करार झाला असल्याने मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंदीराच्या बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मंडळाने केले आहे.