शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

पोषण आहाराची रक्कम पालकांच्या खात्यात जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय पोषण आहाराची मे महिन्यातील रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शालेय पोषण आहाराची मे महिन्यातील रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांत विद्यार्थ्यांचे खाते उघडताना पालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अखेर शिक्षण विभागाने बालकांऐवजी पालकांच्या खात्यावरही रक्कम जमा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. यामुळे खाते उघडण्यास अडचण आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, त्याअनुषंगाने जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पत्र काढून मुख्याध्यापकांकडून लाभार्थ्यांची माहिती मागविली आहे.

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार घरपोच दिला जात होता. दरम्यान, उन्हाळी सुट्टी २०२१मधील म्हणजेच मे महिन्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला गेला नव्हता. या बदल्यात पोषण आहाराची रोख रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार होता. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये, तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे अडीचशे रुपये अनुदान मिळणार होते. दरम्यान, हे अनुदान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्यास सांगितले गेले होते. मात्र, दहा वर्षांखाली मुलांचे बँक खाते राष्ट्रीयीकृत बँका घेत नाहीत. उर्वरित खात्यांसाठीही शून्य बॅलन्सवर खाते उघडण्यास नकार देतात. किमान पाचशे रुपये ठेव आवश्यक असते. त्यामुळे लाभ दीडशेचा अन् खाते उघडण्यासाठी लागतात ५०० रुपये अशी स्थिती झाली होती.

१ लाख ७० विद्यार्थ्यांनी काढली खाती

पाल्याचे बँक खाते काढण्यासाठी पालकांना येणारी समस्या काही दिवसांपूर्वी 'लोकमत'ने आपल्या वृत्तातून मांडली होती. त्यानंतर जिल्हा बँकेने झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास तयारी दर्शविली होती. शिक्षण विभागानेही त्यास मान्यता दिली होती. त्यानुसार आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ५० हजार ८१८ लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७० हजार ३६७ विद्यार्थ्यांनी झिरो बॅलन्सवर खाती उघडली आहेत.

पालकांचा खाते क्रमांक देण्यास मुभा

दरम्यान, आता शासनाला जाग आली असून, नवीन परिपत्रकान्वये पालकांचा खाते क्रमांक देण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. नवीन निर्णयानुसार ज्या मुलांची आधार नोंद आहे, पण बँक खाते नाही (१० वर्षाखाली) अशा विद्यार्थ्यांचा लाभ त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त नावाने असलेल्या बँक खात्यात जमा होईल. तसेच ज्या मुलांची आधार नोंदणी नाही, त्यांची आधार नोंदणी झाल्यानंतरच त्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या किंवा संयुक्त खात्यात रक्कम जमा होणार आहे. शिवाय ज्याठिकाणी बँक उपलब्ध नाही. त्याठिकाणी आधार नोंदणी असलेल्या मुलांच्या / त्यांच्या पालकांच्या / संयुक्त पोस्ट खात्यात रक्कम जमा होणार आहे.

शाळांकडून मागविली माहिती

शालेय पोषण आहार योजनेस पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संकलित करण्याची सूचना जळगाव शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण माहिती संकलित करून जिल्हास्तरावर पाठविण्याचे कळविले आहे.

आतापर्यंत बँक खाती उघडणारे विद्यार्थी

अमळनेर (१७,३८०), भडगाव (५,८२९), भुसावळ (११,५२९), बोदवड (१,६४८), चाळीसगाव (२४,६८५), चोपडा (१०,९१३), धरणगाव (४,५९२), एरंडोल (२,८६९), जळगाव ग्रामीण (९,७९०), जळगाव शहर (१७,५७४), जामनेर (११,१७९), मुक्ताईनगर (७,२०२), पाचोरा (१२,६८३), पारोळा (७,८४०), रावेर (१७,०२४), यावल (७,६३०).