चाळीसगाव : कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता रुग्णवाहिकाचालकांनी ‘सेवा परमो धर्म’ याप्रमाणे काम केले. त्याची कृतज्ञता म्हणून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापदिनी त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली.
खासदार शरद पवार यांच्या प्रागतिक व पुरोगामी विचारांचा वारसा जपत पक्षसंघटन अधिक सक्षम करावे, असा निर्धारही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. संघटनशक्ती हीच पक्षाची खरी ताकद असते. त्यामुळे आगामी काळात याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी केले. किसनराव जोर्वेकर, रामचंद्र जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दिनेश पाटील केले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, शिवाजी आमले, अभय सोनवणे, प्रदीप अहिरराव, रतन साळुंखे, जि. प. सदस्य भूषण पाटील, श्याम देशमुख, मंगेश पाटील, भगवान पाटील, सदाशिव गवळी, दीपक पाटील, जगदीश चौधरी, जयसिंग भोसले, आर. के. माळी, अल्लाउद्दीन शेख, सुरेश पगारे, अरुण पाटील, बाजीराव दौंड, बापू सोनवणे, परशुराम महाले, योगेश पाटील, प्रकाश पाटील, मोहित भोसले, शुभम पवार, आकाश पोळ, गोरख पवार, गौरव पाटील, प्रवीण जाधव, धीरज पाटील, सुशील आमले, पिनू सोनवणे, गुंजन मोटे, सिद्धार्थ देशमुख, रिकी सोनार, अजिंक्य पाटील, जयदीप पाटील, किरण पाटील, तौसिफ खाटीक, कुंतेश पाटील आदी उपस्थित होते. ईश्वर ठाकरे यांनी आभार मानले.