शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात झुकझुक गाडीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:32 IST

इतरत्रही औषधी वनस्पती व शैक्षणिक माहितीयुक्त बगीचे होण्याची शहरवासीयांची अपेक्षा

अमळनेर, जि.जळगाव : शहरात शिवाजी उद्यानाची साफसफाई करून अद्ययावत करण्यात आलाश्र स्केटिंग ट्रॅकही केला, मात्र सर्वसामान्य नागरिक तसेच लहान मुलांना बंद पडलेल्या झुकझुक आगीनगाडी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.शहरात अनेक खुले भूखंड असताना मात्र पालिकेच्या मालकीचा फक्त एकमेव शिवाजी बगीचा लहान मुलांसाठी अद्ययावत आहे. त्या ठिकाणी झोपाळे, घसरगुंडी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाचे साहित्य उपलब्ध आहे. परंतु स्वच्छतेअभावी त्याचा लाभ मोजका होत होता. नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी साफसफाई करण्याचे आदेश दिले, माजी आमदार साहेबराव पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल यांनी समक्ष थांबून बगीचा अद्ययावत केला. शेजारीच स्केटिंग ट्रॅक केला, मात्र सर्वसामान्य नागरिक तसेच मुलांना स्केटिंग परवडत नाही. शिवाजी बगीच्यात अनेक दिवसांपासून लहान मुलांची झुकझुक आगीनगाडी व ट्रॅक उभारून पडला आहे, परंतु ती सुरूच झाली नाही. लहान मुले झुकझुक गाडीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पालिकेने ही गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेचा हा बगीचा आहे. त्याचप्रमाणे हा बगीचा इतर नागरिकांना अत्यंत लांब पडत असल्याने पालिकेने शहराच्या पश्चिम भागातही असा लहान मुलांच्या खेळण्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांना व्यायामाच्या साहित्यासह फुलझाडे लावून बगीचा उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आह.ेत्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने औषधी वनस्पती व विविध फुलझाडे वनस्पतीयुक्त आणि गणितीय व भौमितिक, ऐतिहासिक माहिती असलेले अभ्यासपूर्ण माहितीयुक्त बगीचे उभारण्यात यावेत. जेणेकरून लोप पावत चाललेल्या आयुर्वेदिक वनस्पतींचे संवर्धन होऊन इतिहासाची उजळणी होऊन संस्कार मूल्ये जपली जातील. शैक्षणिक विकास होईल व देशभक्ती दृढ होईल, अशीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.लहान मुलांची झुकझुक गाडी विजेवर चालते आणि त्यामुळे ट्रॅकमध्ये वीज प्रवाह उतरतो, म्हणून मुलांच्या सुरक्षेसाठी ती बंद ठेवण्यात आली आहे. परंतु ट्रॅकभोवती सुरक्षा कवच करून एक स्वतंत्र कर्मचारी किंवा स्वयंसेवी संस्थेला देऊन गाडी लवकरच सुरू करण्यात येईल किंवा सौर ऊर्जेवर चालवण्याचा प्रयत्न केला जाईल.-पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेर