शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शंभरावर बाधितांच्या अमळनेरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:06 IST

सर्वांच्या जोरदार प्रयत्नांचे फळ : आठवडाभरात आढळला केवळ एकच पॉझिटीव्ह

डिगंबर महालेअमळनेर : येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा काही दिवसातच शंभरावर पोहचला होता. रोजच मोठमोठे पॉझिटीव्हचे आकडे समोर येत होते, मात्र गेल्या आठ दिवसात २० तारखेचा १ पॉझिटीव्ह अहवालाचा अपवाद वगळता एकही पॉझिटीव्ह रुग्ण आता आढळलेला नाही. यामुळे शहराची कोरोना मुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू असून प्रचंड धास्तावलेल्या अमळनेरवासियांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.येथील त्रिस्तरीय धोकादायक प्रणालीला ( थ्री लेयर रिस्क फॅक्टर्स ) नियंत्रित करण्यात आणि कालांतराने ही साखळी तोडण्यात प्रशासनाने व डॉक्टर्स यांनी खूप चपळता दाखवली. त्यांनी विना उसंत काम करून सर्व प्रकारचे केलेले प्रयत्न आणि उपचार यामुळेच अमळनेरकरांवरील मोठे संकट टळले आहे . प्रारंभी जे कोरोना बाधित सापडले त्यांच्या अत्यंत निकटवतीर्यांना, नियमित संपर्कातील लोकांना आणि अधूनमधून संपर्कात येणाऱ्या सर्वांचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. वयोवृद्धांवर विशेष फोकस करण्यात आला होता. सर्वांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये कोरोंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या खान-पानाची तेथेच व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचे अनुमानित रुग्ण आणि संक्रमित रुग्ण असे दोन भाग करण्यात आले होते. संक्रमित रुग्णांना प्रारंभी जळगावला व नंतर येथेच उपचार करण्यात आले होते. हे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांचे स्वगृहीच विलगिकरण करण्यात आले. त्यांच्या दैनंदिन गतीविधींवर प्रशासन व संबंधित डॉक्टर्स नियमित लक्ष ठेवून होते.शहरातील २३० खाटांच्या कोविड केअर सेंटरला २४ तास एक आयुष्य वैद्यकीय अधिकारी, एक स्टाफ नर्स, स्वच्छतेसाठी पालिका कामगार व अटेंडंट म्हणून एक पालिकेचा कर्मचारी तैनात आहेत.तर ग्रामीण रुग्णालयातील हेल्थ सेंटरमध्ये २४ तासांसाठी एक अ‍ॅलोपथी डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्डबॉय, एक्सरे तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या नियुक्त केलेल्या आहेत .तेथे प्रारंभी कोरोना बाधित रुग्ण आले त्यांची हाय रिस्क व लो रिस्क अशी विभागणी करण्यात आली. त्याच वेळी कन्टोनमेंट झोनमधील त्रिस्तरीय पॉझिटिव रुग्णांच्या संपकार्तील २२५ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. शेवटचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला त्याआधीच सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामुळे आपोआपच लिंक तुटली. २० रोजी जो पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्यांच्या संपकार्तील बारा जणांचे तत्काळ स्वायब घेण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी या काळात अमळनेरला अनेकदा भेटी दिल्या. सर्व शासकीय अधिकारी व वैद्यकीय यंत्रणेच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या समस्यांचे निराकरण करून कृती करण्यासाठीचे मार्ग मोकळे केले. जेथे जेथे कोरोना रुग्ण आढळले ,त्या भागाची एकदम टाइट नाकेबंदी करण्यात आली . तेथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. आवश्यकता भासली तेथे काहींना सक्तीनेही निपटले. पालिकेने अक्षरश: जीवतोड मेहनत घेऊन साफसफाई मोहीम व निजंर्तुकीकरण सातत्याने केले आहे. किराणा दुकाने व भाजीपाला विक्री स्थळी गर्दी होऊ नये यासाठी नियोजन केले. लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. शासकीय डॉक्टर सोबतच खाजगी डॉक्टरांची या संपूर्ण काळातील अहोरात्र सेवा कमालीची कौतुकास्पद आहे.आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, प्रांताधिकारी सीमा अहीरे, पोलिस उपाधीक्षक राजेंद्र ससाने, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ .गट विकास अधिकारी संदीप वायाळ ,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी सर्व आरोग्य निरीक्षक व त्यांचे सहकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, डॉ. प्रकाश ताळे, डॉ. संदीप जोशी, डॉ. आशिष पाटील, डॉ. गणेश पाटील, डॉ. तनुश्री फडके, डॉ. निलेश सोनवणे, डॉ. मोहसिन पटेल, डॉ. पूजा वाघोले, डॉ. माधुरी सूर्यवंशी,डॉ.अक्षय न्याहळदे , डॉ. तुषार बडगुजर, डॉ. विकास मोरे, डॉ. घनश्याम पाटील, डॉ. भाविक पाटील, डॉ. आर. पी. नेरपगार, अमळनेर आणि अमळगाव ग्रामीण रुग्णालयातील सहा स्टाफ नर्स यांनी कोरोना मुक्तीसाठी आतोनात मेहनत घेतली आहे.