शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी महोत्सवाला अमळनेरची पुरणपोळी

By admin | Updated: March 29, 2017 13:11 IST

आळंदी (देवाची) येथील सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाविकांना देण्यात येणा:या प्रसादासाठी अमळनेर तालुक्यातून 15 हजार पुरणपोळ्या रवाना झाल्या आहेत.

 15 हजार पुरणपोळ्यांचे संकलन :  मिनीट्रक रवाना

अमळनेर, दि.29-आळंदी (देवाची) येथील स्वानंद सुकनिवासी जोग महाराज संस्थापीठ वारकरी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभरापासून सुरु असलेल्या अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाच्या सांगतेसाठी अमळनेर येथून तब्बल 15 हजार पुरणपोळ्या मिनी ट्रकमध्ये रवाना केल्या आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहणा:या भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद देण्यात येणार होता. 
अमळनेरातूनही पुरणपोळ्या देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील महिलांनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारासच पुरणपोळ्या तयार करून त्या अमळनेरला स्वयंसेवकांच्या माध्यमातून आणून दिल्या. केवळ अमळनेर तालुक्यातूनच नाही, तर जिल्ह्यातील इतर तालुक्यातूनही भाविकांनी पुरणपोळ्या आणुन दिल्या. गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीमंगळदेव ग्रह मंदिरात जवळपास 15 हजारहून अधिक पुरणपोळ्या जमा झाल्या. या पुरणपोळ्या मंगळग्रह  मंदिराच्या माध्यमातून आळंदी (देवाची) येथे मिनीट्रक द्वारे पाठविण्यात आल्या आहेत. केवळ पुरणपोळ्याच नाही तर भाविकांनी कुरडया, पापडही आणून दिले होते.