शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

कुख्यात गुंडाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:17 IST

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : गावठी पिस्तूलसह दोन जीवंत काडतुसे जप्त

भुसावळ : अमळनेर येथील कुविख्यात गुंड व नंदूरबार पोलीस स्टेशनला ‘वांटेड’ म्हणून फरार असलेला राकेश वसंत चव्हाण याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. त्याच्यासोबत असलेला भुसावळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी विनोद लक्ष्मण चावरीया हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. ही कारवाई शनिवारी पहाटे ३.३० वाजता करण्यात आली. शहरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे, दरम्यान चव्हाण याने पोलिसांवर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली होती, मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली आहे.अमळनेर येथील चव्हाण याच्यावर अमळनेर, नंदूरबारसह विविध ठिकाणच्या धाडसी चोरी,घरफोडी, सरकारी कामात अडथळा, खुनाचा प्रयत्न करणे आदी प्रकारचे तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत.बाजारपेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात भाग-५ गुरनं. २३९/२०१९ भादंवि कलम ४०१ , ३४ सह भारतीय शस्त्र कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील पंढरीनाथ नगर येथे सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट पोलीस नाईक सनील थोरात, संजय बेदाणे, दीपक जाधव, नरेंद्र चौधरी कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, राहुल चौधरी, बापुराव बडगुजर असे रात्रीची गस्त करीत होते.त्यावेळी त्यांना रेल्वे कर्मचारी डॅनियल जॉर्ज यांच्या खुनातील शहर पोलीस ठाण्यात गुरनं. ९२/२०१९ भादंवि कलम ३०२ मधील फरार आरोपी विनोद लक्ष्मण चावरीया रा.वाल्मीक नगर व नंदूरबार लोहमार्ग पोलिसात गुरनं. २८८/२०१८ भादंवि कलम ३०७,३५३,आर्म अ‍ॅक्ट ३/२५ व अमळनेर पोलिसात विविध गुन्हयातील फरार आरोपी राकेश वसंत चव्हाण रा. अमळनेर हे दोघे जण शहरात घरफोडी व चोरी करण्याच्या इराद्याने आले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पहाटे ३.३० वाजता पंढरीनाथनगर भागात दोन इसम संशयीतपणे जातांना दिसले. त्यांना कोण आहे, थांबा म्हणताच ते पोलिसांना पाहून पळू लागले. पोलीस कर्मचारी यांनी एकाला ओळखले तो विनोद चावरीया होता. त्याचा उमाकांत पाटील, राहुल चौधरी यांनी पाठलाग केला. मात्र तो फरार होण्यात यशस्वी झाला. तर दुसरा संशयित याचा दीपक जाधव, कृष्णा देशमुख यांनी पाठलाग केला.राकेश चव्हाण गावठी रिव्हॉल्व्हर व दोन जीवंत काडतूस बागळतांना आढळला. विनोद चावरीया हा पोलीसांना पाहून पळून गेला म्हणून या दोघांन विरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुरनं २३९ / २०१९ भादंवि कलम ४०१,३४ सह आर्म अ‍ॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका खैरनार करीत आहे.रुक जाओ नही तो गोली मारुंगासंशयित पळतांना दोन ठिकानी पडला. त्याने उठून त्याच्या जवळील गावठी रिव्हॉल्व्हर देशमुख यांच्याकडे करुन ‘रुक जावो, नही तो मे तुम्हें जान से मार डालुगा, अशी धमकी दिली. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करुन त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने नाव राकेश वसंत चव्हाण (३०) रा.बंगाली फाईल प्रताप कॉलेज जवळ अमळनेर. असे सांगितले. त्याच्या जवळ ५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व १ हजार रुपये किमतीची दोन जीवंत गावठी काडतुसे मिळाली. राकेश चव्हाण या त्याचेवर अमळनेर पोलिसात आहे सात गुन्हे दाखल