शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमळनेर येथे मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीबाबत ठेवली झाकली मूठ सव्वा लाखाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:32 IST

चौधरी व वाघ यांना आशीर्वाद आहेत का ? जनतेला विचारला सवाल

अमळनेर : निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे सांगत तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागत सभेत केला. जनतेनेही मोठ्या आवाजात प्रतिसाद दिलादुपारी दीड वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा अमळनेरात पोहचली. येथील फरशी पुलावर रमाबाई आंबेडकर चौकात सभेला सुरुवात झाली. वाहनावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी होते. रस्ते, जलयुक्त शिवार आदी कामांचा उल्लेख त्यांनी केला.झाकली मूठ सव्वा लाखाची...जनतेला आवाहन करताना आमदार शिरीष चौधरी व स्मिता वाघ यांना तुमचा आशीर्वाद आहे का, असा सवाल करीत विधानसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली. मुख्यमंत्री शिरीष चौधरींना जवळ करतात की स्मिता वाघ यांना, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले होते.मुख्यमंत्र्यांचे पैलाड भागात आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात तसेच कळमसरे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम मंडळाने स्वागत केले. यावेळी पूरग्रस्तांसाठी अमळनेर टॅक्सी युनियन पदाधिकारी, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, भाजपच्या कविता जाधव यांनी मुख्यमंत्री निधीला मदत केली.यावेळी व्यसपीठावर उदय वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पंचायत समिती सभापती वजाताई भिल, बाजार समिती सभापती प्रफुल पवार, जिल्हा परिषद सदस्या मीना पाटील, संगीता भिल, माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील, माधुरी पाटील, शहराध्यक्ष शीतल देशमुख, भिकेश पाटील, महेश पाटील, महेंद्र बोरसे, रामभाऊ संदनशिव उपस्थित होते.आणि साहेबरावांना विचारला सवाल...तुमचा जनादेश आहे का, असे आवाहन जनतेला करत असताना गिरीश महाजनांनी फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यावर लागलीच त्यांनी स्मित हास्य करीत तुमचा जनादेश आहे का, असे साहेबरावांना जाहीरपणे विचारले. त्यावर त्यांनीही हसत होकार दिला.पक्षातील गटबाजीचे दर्शनयावेळी भाजपमध्ये गटबाजी असल्याचे स्पष्टपणे उघड झाले. उदय वाघ, पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील, माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांचे वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. तर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचा स्वतंत्र गट पैलाड भागात स्वागताला उभा होता. त्यावेळी ठाकूर समाजाने त्यांना मागण्यांचे निवेदन दिले, पाडळसरे जनआंदोलन समितीने १५०० कोटी दिल्याबद्दल आभार मानले.