शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीच्या आंदोलनाला तांदलवाडी ग्रा.पं.ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 17:52 IST

15 रोजी ग्रामसभा : महिलांनी दिले सरपंचांना निवेदन

ठळक मुद्देतांदलवाडी येथे देशी व हातभट्टीची दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त12 वर्षाच्या मुलांपासून ते 60 वर्षार्पयतच्या वृद्धांना मद्यप्राशनाचे व्यसन दारुच्या व्यसनामुळे गावांत तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले.

ऑनलाईन लोकमत खिर्डी,ता.रावेर, दि.3 - तालुक्यातील ऐनपूर येथील महिलांनी गावात दारुबंदी करीत क्रांतीकारी पाउल उचलल्याने त्यांची प्रेरणा घेत रविवारी तांदलवाडी येथील सुमारे 100 महिलांनी दारूबंदीसाठी सरपंचांना निवेदन दिले. ग्रामपंचायतीने देखील सहकार्य करण्याचे आश्वासन देत 15 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलविली आहे. रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे त्वरीत दारुबंदी करण्याची मागणी महिलांकडून होत आहे. रविवारी ग्रामपंचायत कार्यालयात जवळपास 100 ते 125 महिला जमा होऊन सरपंचांना याबाबत निवेदन देण्यात आले. दारूबंदीसाठी महिलांना सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच श्रीकांत महाजन यांनी दिले. तसेच 15 सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्याचे जाहीर केले.अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारीतांदलवाडी येथे देशी व हातभट्टीची दारुविक्री जोरात सुरु असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. 12 वषार्पासुन ते 60 वर्षार्पयतच्या मुला-माणसांना मद्यप्राशनाचे व्यसन आहे. त्यामुळे गावात अशांतता, भांडणे, मारामा:या व चो:यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्यसनाधिनतेमुळे तरुणांची आत्महत्यादारूमुळे अनेक कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे. दारुच्या व्यसनात तरुण पिढी बरबाद होत आहे. दारुच्या व्यसनामुळे गावांत तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. तसेच तरुणांचे दारुमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. या पुढे आणखी दारुच्या व्यसनांमुळे गैरप्रकार घडू नये म्हणून या सर्व बाबींची दखल घेऊन गावातील देशी व हातभट्टीची दारु त्वरीत कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी गावातील महिलांकडून होत आहे. यावेळी तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन, उपसरपंच कविता सपकाळे, ग्रा.पं.सदस्य नारायण पाटील, नितीन महाजन, किरण चौधरी, आशा चौधरी, योगिता महाजन, मंजुषा पाटील, सोनाली चौधरी, वैशाली झाल्टे, वंदना तायडे, ग्रामविकास अधिकारी डी. सी. पाटील आदी हजर होते.

तांदलवाडी येथील दारूबंदी साठी गावातील महिलांना सहकार्य करीत आहे. 15 सप्टेंबर रोजी गावात  दारुबंदी साठी ग्रामसभा  घेण्यात येणार आहे. याची माहिती  जिल्हाधिकारी, रावेर तहसीलदार, उत्पादन शुल्क अधिकारी, पोलीस प्रशासन  यांना दिली आहे. दारूबंदीचा ठराव करीत  पुढील कृती करण्यात येईल.- श्रीकांत महाजन, सरपंच.