जामनेर : हमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांचा माल खरेदी न करणारे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरीत असल्याचा आरोप आ. गिरीश महाजन यांनी सोमवारी जामनेर येथे केला. शासकीय ज्वारी खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जामनेर येथील केंद्रावर ७५० शेतकऱ्यांनी ज्वारीची नोंदणी केली असून सुमारे २४ हजार क्विंटल ज्वारी मोजणीच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. मात्र, शासनाने जामनेरसाठी फक्त १ हजार ६५० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिले असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. चिंचखेडे बुद्रुक (ता. जामनेर) येथील शेतकरी आनंद पाटील यांची ज्वारी मोजणी करून महाजन यांनी त्यांचा टोपी घालून सत्कार केला.
यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे, सभापती चंद्रकांत बाविस्कर, उपसभापती बाबूराव गवळी, संजय देशमुख, रमेश नाईक, डॉ. सुरेश पाटील, आतिष झाल्टे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
जामनेर येथे ज्वारी खरेदी वेळी शेतकरी आनंदा पाटील यांचा सत्कार करताना आ. गिरीश महाजन.
१५सीडीजे ५