शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

युतीसाठी ‘पहले आप..पहले आप’

By admin | Updated: January 11, 2017 00:55 IST

जि.प.निवडणूक : खडसेंच्या भूमिकेनंतर सेनेकडून प्रतिसादाची अपेक्षा

जळगाव : काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता घोषित होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कुरूक्षेत्र गाजविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपा युतीसाठी आपण आग्रही असल्याची भूमिका  जाहीर केल्यानंतर शिवसेनेकडून प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्यातरी दोन्ही पक्षातील युतीबाबत ‘पहले आप..पहले आप’ अशी भूमिका आहे.युतीला विरोध करणारे खडसे युतीसाठी आग्रहीशिवसेना व भाजपाची युती विधानसभा निवडणुकीत तुटली. भाजपाने निर्णय घेतल्यानंतर युती तोडायची घोषणा एकनाथराव खडसे यांनीच केली. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा मिळवित सत्ता संपादन केली. खडसे यांच्यावर भोसरी येथील भूखंड प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. विधानसभेच्या वेळी युती तोडण्याची जबाबदारी स्वीकारणा:या एकनाथराव खडसे यांनीच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युतीसाठी पुढाकार घेतला आहे.पारोळ्यात ए.टी.पाटलांचा पुढाकारमाजी मंत्री खडसे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर पारोळा व एरंडोल तालुक्याची जबाबदारी असलेल्या खासदार ए.टी.पाटील यांनी शिवसेना व भाजपा युतीसाठी पुढाकार घेत सेनेसोबत चर्चा सुरू केली आहे. सोमवारी झालेल्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान या विषयावर चर्चा होऊन सेनेने ही जबाबदारी माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यावर सोपविली आहे.तुझं माझं जमेना अन् तुङयावाचून करमेनापालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. गेले 20 वर्ष शिवसेनेने सत्तेचे लोणी चाखले. आरोपीच्या पिंज:यात मात्र भाजपाला ठेवले. असे सांगत स्वबळाचा नारा दिला. तिकडे शिवसेनेने देखील भाजपा शासनाच्या धोरणाविरोधात वेळोवेळी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतदेखील दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चूल मांडली. त्यामुळे सध्यातरी शिवसेना व भाजपाचे ‘तुझं माझं जमेना अन् तुङया वाचून करमेना.’ अशी स्थिती आहे.शक्तीस्थळांची दोघांकडून तपासणीशिवसेना व भाजपाने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गट आणि गणातील शक्ती तपासली आहे. धरणगाव, पाचोरा, जळगाव ग्रामीण, चोपडा, भडगाव, एरंडोल, पारोळा या तालुक्यांमध्ये शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे. तर जामनेर, मुक्ताईनगर, यावल, चाळीसगाव, बोदवड या तालुक्यात भाजपा प्रबळ आहे. दोन्ही पक्षांकडून गट आणि गणांमधील आपली शक्ती तपासण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कमकमुवत बाजू आहे. त्या ठिकाणी युतीसाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.युती करण्याचे अधिकार हे आम्ही तालुकापातळीवर दिले आहेत. तालुकाध्यक्षांकडून प्रस्ताव आल्यानंतर तो राज्याला पाठविण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल. धरणगाव, जळगाव ग्रामीण व पाचोरा तालुक्यात युती होणार नाही. सन्मापूर्वक वागणूक मिळणार असल्यास युतीसाठी प्रयत्न केले जातील.-गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार युतीसाठी प्रयत्न केले जातील. मात्र शिवसेनेकडून अद्याप तसा कोणताही प्रस्ताव नाही. प्रेम हे दोन्ही बाजूने असावे. केवळ भाजपाने शिवसेनेवर प्रेम करून चालणार नाही. शिवसेनेने देखील होकार भरणे आवश्यक आहे. -उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा.