शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्यांसह तिघे जाळ्यात

By admin | Updated: July 5, 2016 16:21 IST

गावठी कट्ट्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांच्या मुसक्या सोमवारी बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने आवळत तीन जिवंत काडतुसे व कट्टे जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे़

ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि. ५ : गावठी कट्ट्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांच्या मुसक्या सोमवारी बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने आवळत तीन जिवंत काडतुसे व कट्टे जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे़ जंक्शन शस्त्र विक्रीचे केंद्र ठरत असल्याची बाब या घटनेने पुन्हा अधोरेखीत झाली आहे़. 

शेख उमर शेख उस्मान (२४), अनिकेत उर्फ बब्बू संजय नागपूरे (२१, दोन्ही रा़शिवाजीनगर, भुसावळ) व दीपक उर्फ कुणाल भुरालाल जारवार (२२, रामदासवाडी, हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़

गुप्त माहितीवरून कारवाई शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ काही तरुण शस्त्र विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रोहिदास पवार व निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना मिळाल्यावरून डीबी पथकाचे हवालदार निशिकांत जोशी, इरफान काझी, सुधीर विसपुते, सुनील थोरात, वाल्मीक सोनवणे, तुषार जावरे, संजय पाटील, युसूफ तडवी, प्रशांत चव्हाण, नीलेश बाविस्कर, श्रीकृष्ण देशमुख, राहुल चौधरी, दीपक जाधव, महेंद्र लहासे आदींनी सोमवारी सकाळी सापळा रचून आरोपींवर झडप घातली़ आरोपींच्या अंग झडतीत प्रत्येकाकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली़ त्याचे एकूण बाजारमूल्य १५ हजार ६०० रुपये आहे़

आरोपींविरुद्ध गुन्हापोलीस नाईक सुनील सैंदाणे यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुरनं ३८१/२०१६, आर्म अ‍ॅक्ट कलम ३/२५, मुंबई पोलीस अ‍ॅक्ट १९५१ चे कलम ३७ (१) ३ चे उल्लंघण १२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़