शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील निमगाव-टेंभी ग्रा.पं.चे सर्व सदस्य अपात्र, ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:41 IST

यावल तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या आदेशाने ग्रामपंचायत क्षेत्रात प्रचंड खळबळ

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे. ग्रामपंचायतीच्या रक्षकांनीच कराचा भरणा वेळे केला नसल्याची बाब पंचायत समीतीच्या वतीने करण्यात आलेल्या नियमीत दप्तर तपासणीत उघड झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.तालुक्यातील निमगाव टेंभी ग्रुप ग्रामपंचायतीत नऊ सदस्य संख्या आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी पंचायत समितीच्या वतीने करण्यात आलेल्या नियमीत दप्तर तपासणीत सरपंच उज्ज्वला प्रदीपसिंह पाटील, उपसरपंच प्रमोद हरिदास तावडे, सदस्य रूपाली दिलीप चौधरी, निशा शेखर तायडे, कविता धनराज तावडे, संजय चंद्रकांत तावडे, कविता संजय तावडे, दिलीप कडू पाटील व उज्ज्वला वीरंद्र्रसिंग पाटील या नऊ सदस्याना ग्रामपंचायतीच्या थकबाकीचे देयक मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत कर भरणा करावयास पाहिजे होता, मात्र सदस्यांनी मुदतीत कर भरणा केला नसल्याचे आढळून आल्याने ग्रामपंचायतीला देणे असलेला कर मुदतीत भरणे अपेक्षित होते. मात्र, सदस्यांनी कर वेळत भरला नसल्याचे तपासणीत आढळून आल्याचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सांगितले. पंचायत समितीने मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सदस्यांच्या थकबाकीचा अहवाल सादर केला होता.जिल्हाधिकाºयांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ (ह) प्रमाणे निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांना अपात्र केले आहे. जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयाने ग्रामपंचायत क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. तालुक्यात अजून किती ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी वेळेवर कर भरणा केला नाही यासंदर्भातही शासनाने कारवाई करावी, असा सूरही ग्रामस्थांमध्ये उमटत आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतYawalयावल