शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूलचा धाक दाखवून चौघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 19:14 IST

अमळनेर : चारचाकीला दोन मोटरसायकलवरील सहा जणांनी अडवून पिस्तूलचा धाक दाखवून चौघांना २० हजार रुपये रोख व चार मोबाईल ...

अमळनेर : चारचाकीला दोन मोटरसायकलवरील सहा जणांनी अडवून पिस्तूलचा धाक दाखवून चौघांना २० हजार रुपये रोख व चार मोबाईल लुटून नेल्याची घटना २६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अमळनेर-धुळे रस्त्यावर जानवे डांगर गावाजवळ घडली.विजय मगन सोनवणे कर अधिकारी रा धुळे, दीपक कैलास नांद्रे रा.धुळे, डॉ.व्यंकट गोविंद मेकाळे रा.नवी मुंबई, अनिल रमेश वळवी रा.रायपूर, ता.नवापूर जि.नंदुरबार हे चारचाकी क्रमांक एमएच-१९ बीयू-२१४४ वरून अमळनेर येथून रात्री साडे दहाच्या सुमारास पैलाड येथून धुळ््याकडे निघाले. जानवेपासून १ किमी अंतरावर डांगर गावाजवळ दोन मोटरसायकलवर सहा तरुणांनी आपल्या मोटारसायकली आडव्या केल्या. त्यातील एकाने हातातील पिस्तुल त्यांच्या दिशेने रोखले व काच उघडण्यास सांगत असताना काळ्या रंगाचा कोट घातलेल्या तरुणाने सात ते आठ किलोचा दगड काचेवर मारून गाडीच्या खिडकीची काच फोडली. त्यात विजय सोनवणे यांच्या हाताला व मांडीला जखम झाली. चोरांनी धमकी देत सोनवणे यांच्याकडील ५ हजार रुपये व एक मोबाईल, नांद्रे यांच्याकडील चार हजार व मोबाईल, डॉ.मेकाळे यांचे ९ हजार व मोबाईल, वळवी यांचे तीन हजार व १ मोबाईल असा एकूण २१ हजारांसह चार मोबाईल हिसकावून पळून गेले. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व पोलिसांनी यांनी धाव घेतली. मात्र आरोपी मिळून आले नाहीत.दरम्यान, घरफोडीत दोन मोटारसायकली व सहा तरुण आणि दरोड्यातदेखील तशीच स्थिती असल्याने व पारोळा येथील गोळीबाराच्या घटनेशी अमलनेरचा संबंध असल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी स्वप्नील नाईक, सुधाकर लहारे, रामचंद्र बोरसे, नारायण पाटील, राजेश मेंढे यांनी घटनास्थळी भेटी देऊन आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत.अमळनेर पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहेत.