शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांमध्ये घुमला ‘जय हनुमान’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रामभक्त हनुमानासह प्रभू रामचंद्रांचे गुणगान गाणारी अनेक सुमधुर गीते, हनुमानचालिसा पठण, रामनामासह रामभक्त हनुमानाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रामभक्त हनुमानासह प्रभू रामचंद्रांचे गुणगान गाणारी अनेक सुमधुर गीते, हनुमानचालिसा पठण, रामनामासह रामभक्त हनुमानाचा जयघोष, अशा भक्तिमय वातावरणात मंगळवारी शहरातील मंदिरांमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत आरती करण्‍यात येऊन साधेपणाने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्‍यात आला.

जळगाव शहराला कोरानाचा विळखा घट्ट होत असताना विविध ठिकाणी सामाजिक अंतर पाळून व योग्य ती खबरदारी घेऊन भक्तांनी हनुमान जयंती घरच्या घरी साजरी केली. देवळात पुजाऱ्यांनी पूजा केली. लवकरात लवकर कोरोनामुक्तीबाबत हनुमानाला साकडे घालण्यात आले. पहाटे ५ वाजेपासून मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘जय जय जय, जय बजरंगबाली’च्या जयघोषात सर्वच मंदिरे दुमदुमली होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे दर्शनासाठी बंद होती. त्यामुळे मंदिरांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

साधेपणाने जयंती उत्सव

गोलाणीतील दक्षिण मुखी हनुमान मंदिर, तपस्वी हनुमान मंदिर, पत्र्या हनुमान मंदिर, अन्नदाता हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, नवसाला पावणारा हनुमान मंदिर, पाताल हनुमान मंदिर, केशरीनंदन हनुमान मंदिर आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करीत अत्यंत साधेपणाने जयंती साजरी करण्‍यात आली.

संगीतमय सुंदरकांड

हनुमान मंदिरांमध्ये सकाळी ६ वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत संगीतमय सुंदरकांड, सत्यनारायण कथा, महाआरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. सकाळी काही प्रमाणात मंदिरांमध्ये दर्शनासाठी नागरिकांची किरकोळ गर्दी बघायला मिळाली. भाविकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात होते. रथ चौकातील व पांडे चौकातील हनुमान मंदिरांवर सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले.