शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अहिरवाडी फिडरला वारा व पावसाची झाली आहे अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:02 IST

संताप : वाघोड, कर्जोद व आहिरवाडीत अनेकदा होतो अंधार

रावेर : शहरातील १३२ केव्ही विद्युत केंद्रातून अहिरवाडी, कर्जोद व वाघोड गावांसाठी निघालेल्या स्वतंत्र फिडरवर वादळचं नव्हे तर हलका वारा वा पाऊस असला तरी रात्र रात्रभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने, सदर फिडरला वारा व पावसाची अ‍ॅलर्जी झाली आहे का? अशी तीव्र नापसंती उभय ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.एखाद्या वादळात वा विजांच्या कडकडाटात वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज ग्राहकही परिस्थितीनुरूप तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन संयमाने ते सहन करीत असतात. मात्र, हलक्या वाऱ्याची झुळूक वा पावसाच्या सरी जरी कोसळल्या तरी अहिरवाडी फिडरवरील वीजपुरवठा खंडित झाला तर तो रात्र रात्रभर खंडीतचं असतो. यामुळे वाघोड, कर्जोद व अहिरवाडी ही तिन्ही गावे अंधारात बुडत असल्याची शोकांतिका आहे. रावेर ते अहिरवाडी हे फिडर अंकलेश्वर - बºहाणपूर रोडलगत रहदारीच्या रस्त्यावर असतांना, सदर फिडर सातत्याने वीजपुरवठा खंडित होईल एवढे अतिसंवेदनशील कसे ? फिडरवरील वीजतारा वा अन्य सामुग्री जीर्ण झाली काय? असा सवाल संतप्त ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. तत्संबंधी उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी तथा सावदा विभागीय कार्यकारी अभियंता यांनी गांभीर्याने दखल घेऊन सदरची समस्या कायमची धसास लावावी अशी जोरदार मागणी होत आहे.समस्या सोडवावीअहिरवाडी फिडरच्या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी वाघोडचे शिवसेना शाखा प्रमुख कमलेश पाटील व ग्रामस्यांनी केली आहे.