शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकारी पैसे मागतात

By admin | Updated: August 28, 2014 14:59 IST

कृषी अधिकारी खत व निविष्ठा विक्रेत्यांना बळजबरीने निविष्ठा घेण्याची सक्ती करतात आणि विक्रेत्यांकडे तपासणी कार्यक्रम राबवून पैसे मागतात, असा आरोप सदस्यांनी जि.प. स्थायी समितीच्या सभेत केला.

जळगाव : जि.प.तील कृषी अधिकारी खत व निविष्ठा विक्रेत्यांना बळजबरीने निविष्ठा घेण्याची सक्ती करतात आणि विक्रेत्यांकडे तपासणी कार्यक्रम राबवून पैसे मागतात, असा आरोप सदस्यांनी जि.प. स्थायी समितीच्या सभेत पुन्हा एकदा केला. 

याप्रकरणी कारवाईचे आश्‍वासन देऊन जि.प. प्रशासनाने नेहमीप्रमाणे मागील पानावरून पुढे, असा कार्यक्रम केला. जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या अध्यक्षतेत सभापती हर्षल पाटील, लीलाबाई सोनवणे, राजेंद्र राठोड, सीईओ शीतल उगले, अतिरिक्त सीईओ सुनील गायकवाड उपस्थित होते. खत वितरकांकडून पैशांची मागणी केली जाते, असा आरोप अशोक कांडेलकर यांनी केला. 
 
कृषी अधिका-यांकडून खतांचा काळाबाजार
खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि शेतकर्‍यांना नाडले जाऊ नये यासाठी कार्यरत कृषि विभागाचे अधिकारीच कंपन्याकडून युरीयाची उचल करून त्याचा काळाबाजार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन कृषि केंद्रांच्या नावाने युरीयाची खरेदी केली जाते. कंपन्या युरीयाचा पुरवठा करतात त्या वेळी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना दम भरून युरीया कृषि अधिकारी आपल्या बगलबच्च्यांकडे पोहोचवितात. ग्रामस्थांच्या तक्रारी जि.प.सदस्यांकडे आल्या. या प्रकाराचा त्रास जि.प. सदस्यांनाही झाला. यावरून जि.प.च्या पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी कृषि विकास अधिकारी पवन पाटील यांना खडसावले आहे. 
२00 टनचा वाटा हवाचजि.प. कृषि विभागातील अधिकारी युरीयाचा रॅक आल्यानंतर पुरवठा करणार्‍या कंपनीच्या प्रतिनिधींना कुठल्याही स्थितीत किमान २00 टन युरीया आपापल्या बगलबच्च्यांना मिळाव्यात यासाठी फिल्डींग लावतात. बगलबच्चे धरणगाव तालुक्यातून युरीयाची विल्हेवाट ही औरंगाबाद आणि इतर ठिकाणी लावत आहेत. युरीयाच्या काळाबाजाराबाबत एकही कारवाई जि.प. कृषि विभागाने आतापर्यंत केलेली नाही याचा अर्थ काय? असाही प्रश्न पडतो. 
४00 रुपयांवर विक्रीसध्या ग्रामीण भागात युरीयाची ४00 ते ४५0 रुपये प्रति गोणी या दरात विक्री होत आहे. तर शहरात किमान ३५0 रुपयात विक्री केली जात आहे. याकडे कृषि अधिकार्‍यांनी सोयीस्कर कानाडोळा केला आहे. 
बैठकीत पडसादमंगळवारी जि.प.कृषि विभागात खत कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यात या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या कंपनीशी प्रामाणिक राहीलेले, कंपनीच्या उपयोगात आलेल्या खत विक्रेत्यांना व कंपनीच्या वितरकांना सर्वप्रथम युरीया देण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, असा मुद्दा या बैठकीत मांडला. तसेच कृषि विभागाच्या आदेशानुसार कुठल्याही विक्रेत्याला ऐनवेळी युरीया दिला जाऊ शकत नाही. कारण हेच विक्रेते नंतर आपल्या कंपनीचे डीएपी व इतर महागडे मिश्र खत घेण्यास नाक मुरडतात, असेही सांगितले. त्यावर कृषि विभागातील अधिकारी मात्र निरूत्तर झाले. पण याच बैठकीत ज्या कंपनीचे प्रतिनिधी कृषि विभागाचे निर्देश मानणार नाहीत त्यांनी या जिल्ह्यात आपले कुठलेही खत यापुढे आणू नये, असा दम कृषि अधिकार्‍यांनी भरल्याची माहिती मिळाली आहे.
-----------------
युरीया सर्वात स्वस्त रासायनिक खत आहे. त्याची सर्वाधिक मागणी शेतकरी करतात. याचा लाभ नेमका दलाल मंडळीने उचलला आहे. त्यांना कृषि विभागाची भक्कम साथ लाभली आहे. सक्तीने कृषि निविष्ठा खरेदी करायला लावण्याच्या कोणत्याही प्रकरणाशी माझा संबंध नाही. मध्यंतरी आमच्या विभागातील अधिकार्‍यांना ताकीद दिली होती. -पवन पाटील, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद