शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक आणि पदाधिकाºयांमध्ये बाचाबाची

By admin | Updated: February 8, 2017 00:08 IST

चाळीसगाव : अनधिकृत कामामुळे दुकानदारी अडथळा येत असल्याची कैफियत घेवून गेलेल्या दुकानदारांना पालिकेत योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पालिका गेटसमोर ७ रोजी सकाळी ‘कपडे काढा’ आंदोलन

चाळीसगाव : नगरपालिकेच्या अनधिकृत कामामुळे दुकानदारी अडथळा येत असल्याची कैफियत  घेवून गेलेल्या दुकानदारांना पालिकेत योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अचानक त्यांनी पालिका गेटसमोर ७ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान  पालिकेचे गेट बंद करुन ‘कपडे काढा’ आंदोलन करीत खळबळ उडवून दिली. या दरम्यान पालिकेतील पदाधिकारी दाखल झाल्याने दुकानदार व त्यांच्यात बाचाबाची होवून पालिकेतील वातावरण चांगलेच तापले. या प्रकाराबाबत दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, भडगाव रोडवरील एलआयसी आॅफिस जवळ जेसीबी मशीनने गटारीसाठी मोठी चारी खणली आहे, गेल्या सहा दिवसापासून कामाची स्थिती तशीच असल्याने येथील दुकानांमध्ये ये-जा करण्यासाठीचा रस्ता बंद झाला आहे, याचा परिणाम व्यवसायावर होवून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत ६ रोजी नगरपालीकेला व्यावसायिकानी निवेदन देवुन  चारीत पाईप टाकून गटारीचे काम पूर्ण करावे  अशी मागणी केली होती.  मात्र दखल न घेतल्याने ७-८ दुकानदारांनी ७ रोजी पालिका गाठली. याठिकाणी मुख्याधिकारी श्रीकुष्ण भालसिग व बांधकाम अभियंता राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन गटारीचे काम केव्हा  होणार असल्याची  विचारणा त्यांनी केली असता मुख्याधिकारी यांनी या कामाची कुठलीच माहिती नसल्याचे सांगताच दुकानदार संतप्त  झाले.  हे काम अनधिकृत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे असून पालीकेच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी दुकानदारांनी गेटसमोर समोरच कपडे काढा आंदोलन केले. ही बाब कानावर येताच पालिका सत्ताधारी गटनेते राजेंद्र चौधरी, भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील आदी पदाधिकारी आंदोलन स्थळी आले. यावेळी पदाधिकाºयांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दाखल झालेल्या पोलिसांसमोर आंदोलक व पदाधिकाºयांमध्ये बाचाबाची झाली. या दरम्यान घृष्णेश्वर पाटील यांनी संयमी भूमिका घेत तातडीने पाईप टाकण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले.  या आंदोलनात  खुशाल पाटील, पप्पू पाटील यांचेसह ७-८ दुकानदार सहभागी झाले होते. तसेच आंदोलनाला रयत सेनेचे गणेश पवार व पदाधिकाºयांनी पाठिंबा दर्शवत होणाºया अन्ययाबाबत पदाधिकाºयांना जाब विचारला आणि होणारी गैरसोय  दूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)पालिका मुख्याधिकारी दालनात भानुदास मराठे (भावडू), खुशाल पाटील, गणेश पवार व इतर चार ते पाच जणांनी अरेरावी करीत उर्मटपणाची भाषा वापरुन शिवीगाळ केली. नंतर मुख्याधिकार श्रीकृष्ण भालसिंग हे दालनातून निघून गेले. असता वरील सर्व व्यक्तीनीपालिकेचे मुख्य गेट बंद करुन ये- जा करणारे कर्मचारी व नागरिकांचा रस्ता अडविला. तसेच कर्मचाºयांना कोंडून ठेवले. अंगावरील कपडे काढून सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद वर्तन केले म्हणून चाळीसगाव पोलिसात वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे करीत आहे.आंदोलकांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न - राजेंद्र चौधरीशहरातील एलआयसी कार्यालय परिसरातील गटार तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावरुन पाणी वाहात होते. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले होते. त्यासाठी त्या गटारीचे काम सुरु केले होते. सुट्टी व आचारसंहितेच्या कामामुळे दोन दिवस पाईप उशीरा आले. आम्हाला विकासासाठी लोकांनी निवडून दिले आहे. केवळ राजकारण करुन कर्मचाºयांवर दहशत  निर्माण करुन अर्धनग्न केलेला हा प्रकार पूर्णत: चुकीचा होता. विकासाचे काम करताना अशा प्रकारच्या कोणत्याही विरोधाला आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी आंदोलनाबाबत व्यक्त केली. तसेच नागरिकांनी चांगल्या कामांसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.