शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बिडगावसह धानोरा परिसरात पुन्हा १६ तास बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:51 IST

बिडगाव, ता.चोपडा : बिडगावसह धानोरा परिसरात विजेची समस्या अद्याप कायम आहे. रविवारी रात्री आठ वाजेला पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे ...

बिडगाव, ता.चोपडा : बिडगावसह धानोरा परिसरात विजेची समस्या अद्याप कायम आहे. रविवारी रात्री आठ वाजेला पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे परिसरातील वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे तब्बल डझनभरापेक्षा जास्त गावे सोमवार दुपारी १२ वाजेपर्यंत अंधारात होती.बिडगाव-धानोरासह परिसरात वारंवार गायब होणाऱ्या विजेने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ही समस्या आता नित्याची झाली आहे. मात्र वीजमंडळ कार्यालय याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. धानोरासह परिसरातील बिडगाव, मोहरद, वरगव्हान, खर्डी, पंचक, लोणी, मितावली, पुणगाव, पारगाव, देवगाव, कुंड्यापाणी, शेवरे, चांदण्यातलाव आदी गावांना धानोरा येथील विजवितरणच्या कार्यालयातुन विजपुरवठा होतो. मात्र थोडेही वादळ किंवा पाऊस आला तरी धानोरासह परिसरातील वीज वारंवार गायब होते. रविवारी रात्रीही परिसरात पाऊस झाला व नेहमीप्रमाणे वीज गायब झाली. चोपड्याहून धानोरा सबस्टेशनला जोडणाºया पुरवठ्यावर बिघाड झाला व तो सोमवारी सकाळी बारा वाजेलाच सुरूळीत झाला. त्यामुळे पाऊस सुरू असतानाही तब्बल १६ तास गावे अंधारात होती. याबाबत रात्रीच ‘लोकमत’च्या प्रतिनिधीसह अनेक गावांचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांनी चोपडा येथील विजवितरणचे उपअभियंता मेघश्याम सावकारे यांना फोनद्वारे संपर्क केला. रात्री उशिरापर्यंत बिघाड सापडला नसल्याचे सांगत सकाळीच लवकर तो सुरळीत करणार असल्याचे त्यांनी कळवले होते. मात्र दुसºया दिवशी बारा वाजेला वीजपुरवठा सुरळीत झाला.सोळा तास बंद असलेल्या पुरवठ्यामुळे पाणी पुरवठाही झाला नाही. तसेच ग्रामस्थ शेतकरी, छोटे व्यावसायिक हैराण झाले. केवळ पावसामुळेच नाही इतर वेळीही वारंवार होणाºया या प्रकारावर नियंत्रण आणावे यासाठी लोकप्रतिनिधी तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून ठोस पाठपुराव्याची मागणी होत आहे.