शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात तब्बल सहा वर्षानंतर सीटीस्कॅन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 12:31 IST

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

ठळक मुद्देवर्षभरात एमआरआय हस्तक्षेप करू नयेमंत्री येणार म्हणून ‘सिव्हील’चकाचक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14 - तब्बल सहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटीस्कॅन सुविधेचा शुभारंभ शुक्रवारी दुपारी वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. वर्षभरात एमआरआयची देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाईल व या ठिकाणी राज्यभरातील डॉक्टर आणण्यात येऊन  रुग्णालयाचा कायापालट करणार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली.सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे,  चंदुलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन.एस. चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील उपस्थित होते.  जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन सेवा नसल्यामुळे रुग्णांचे मोठे  हाल होत होते. मात्र आता गैरसोय दूर होणार आहे.वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने येथे राज्यभरातील तज्ज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून येथे कोणतीच कमी राहणार नाही. वर्षभरात एमआरआयची सुविधा देखील सुरू करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे मात्र राजकीय, सामाजिक कार्यकत्र्यानी या ठिकाणी डॉक्टरांसोबत वाद घालून किरकोळ कारणांसाठी सिटीस्कॅनचा आग्रह धरू नये  तसेच राजकीय नेत्यांनी सुद्धा यात हस्तक्षेप करू नये, असे आवाहन गिरीश  महाजन यांनी केले.जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील येणार असल्याने  जिल्हा रुग्णालय चकाचक केले होते.मार्च-एप्रिलमध्ये प्रवेश प्रक्रियाजिल्हा रुग्णालयापासून सुरुवात झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस मार्च-एप्रिल महिन्यात  सुरुवात  करणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.